बीड - एकीकडे दिवाळीचा उत्सव सुरू असतांना दुसरीकडे मात्र अतिवृष्टी पीडित शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत. बीडच्या कुर्ला, औरंगपूर
गावच्या शिवारातून वाहणाऱ्या सिंदफना नदीने पात्र बदलल्याने, उभ्या पिकांसह जवळपास 5 एक्करवरील जमिनी वाहून गेल्या आहेत. सिंदफना नदीवरील औरंगपूर शिवारातील केटीवेअर बंधाऱ्यालगत, नदीने पात्र बदलले आहे. यामुळे औरंगपुरच्या कल्याण उनवणे, जिजाबाई श्रीरंग उनवणे, संजय घोडके यांच्यासह 10 ते 12 शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली आहे. मात्र, अद्यापपर्यंत प्रशासनाने याची दखल घेतली नाही.
अश्रू अनावर - गतवर्षी कल्याण उनवणे यांची विहीर वाहून गेली होती, तर दोन दिवसापूर्वी त्यांचा बोरही वाहून गेलाय. त्याचबरोबर यंदा झालेला अतिवृष्टी त्यांच्या जवळपास 30 फूट जमीनिला देखील नदीचं रूप आलंय. त्यामुळे आता कुठे पेरावा ? आता जगावं कसं ? असा प्रश्न त्यांच्यापुढं उभा आहे. तर लोकांची व्याज व्यवहारी करून पाच एकर जमीन घेतली. मात्र त्यापैकी जवळपास 5 एकर जमीन वाहून गेली. आणि या जमिनीला नदीचे स्वरूप आलं. यामुळे आमच्या कुटुंबांने जगावं कसं ? कुठे पेराव ? असा प्रश्न आहे. अशी आपली व्यथा सांगताना महिला शेतकरी जिजाबाई उनवणे यांना अश्रू अनावर झाले आणि त्या ढसाढसा रडल्या. दरम्यान याविषयीच्या शेतकऱ्यांच्या व्यथा थेट शेताच्या बांधावरून.
रोज ही नदी जमीन थोडी-थोडी खाते - गेल्या वर्षीच्या पावसाने बंधारा तुंबल्यामुळे नदीने बाह्य वळण घेतले आहे. बंधारा फुटला या बंधाऱ्यामुळे आमची जमीन ही वाहून गेली, आता काय कराव? हे सुचत नाही आणि रोज थोडी-थोडी जमीन नदी घेऊन चालली आहे. रोज ही नदी जमीन थोडी-थोडी खातच झाली आहे. आम्हा इथल्या शेतकऱ्यांना पडला आहे की आम्हाला जमीनच राहती का नाही? अशी खंतही त्यांनी उपस्थित केली आहे. आता काय काम करायचे? असा प्रश्न उपस्थित करत या ठिकाणी जवळपास 40 ते 50 फूट खोल नदीने खड्डा केला आहे असही दु:खही त्यांनी व्यक्त केले आहे.
आम्हाला आश्वासन दिले - कापूस वेचायचा की असाच पाण्यामध्ये जाऊ द्यायचा हा प्रश्न आहे, गेल्या दोन वर्षापासून या बांधायचा आम्ही काम करत आहोत असे शासनाचे म्हणणे आहे. विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेब यांनीही येथे भेट दिली आहे. जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा त्यांनी ही भेट दिली, इथे येऊन आम्हाला आश्वासन दिले, की लवकरात-लवकर आम्ही हे काम सुरू करू, काम योग्य वेळेला चालू झाले असते तर आज ही आमची जमीन वाहून गेली नसती, लवकरात लवकर याच्यावर पर्याय करावा अशी मागणी आम्ही करत आहोत असही ते म्हणाले आहेत.
सरकारने काहीही केलं नाही - शेतीवरच आमचे सगळे जीवन आहे. शेती शिवाय आमच्याकडे दुसरे उत्पन्नाचे साधन नाही, याची लांबी रुंदी रुंदी किती गेली आमची पाच एकर जमीन वाहून गेली, तिन्ही मुलं शेतकरीच आहेत. आमचे, मालकही शेतीच करतात. त्यामुळे आम्हाला शेती शिवाय दुसरा पर्याय नाही. आमचे पोट याच्यावरचं आहे. जनावरांचे खाने यांच्यावरच आहे, गेल्या वर्षीपासून नुकसान होतंय पण सरकारने काहीही केलं नाही अस मत त्यांनी व्यक्त केले आहे.
आम्हाला पूर्ववत करून द्यावी - आमची हात जोडून सरकारला विनंती आहे, की त्यांनी लगेच हा बंधारा करावा आणि आमची जी शेती आहे ती आम्हाला जशी आहे तशी करून द्यावी. पाच एकर जमीन वाहून गेली आहे. आमची जमीन आहे तशी करून द्या आणि बंधाराही झाला पाहिजे, पावसामुळे रोजची दहा पाच फूट जमीन वाहून जात आहे, नाहीतर आम्हाला जगण्याची काही अपेक्षा नाही. जमिनीचा वाहून गेली आहे ती चाळीस फूट खोल खड्डा पडला आहे. बंधारा फुटल्यामुळे हा प्रकार घडला आहे. मान्य आहे की आमची जमीन आहे ते आम्हाला पूर्ववत करून द्यावी अशीच आमची सरकारला मागणी आहे.