ETV Bharat / state

गोपीनाथ मुंडेंचे विचार नेटाने पुढे नेण्याचे काम धनंजय मुंडेच करताहेत - शरद पवार - पंकजा मुंडे

गोपीनाथ मुंडेंनी अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन अनेक वर्ष राजकारण केले. तेच काम आता मोठ्या नेटाने पुढे घेऊन जाण्याचे काम विरोधी पक्षात कोण करत आहे, असे बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला विचारले तर तुम्हाला कोणीही सांगेल. गोपीनाथ मुंडेच्यानंतर धनंजय मुंडे हे समर्थपणे काम करत आहेत.

बीडमध्ये बजरंग सोनवनेची प्रचार सभा
author img

By

Published : Apr 14, 2019, 5:24 PM IST

बीड - गोपीनाथ मुंडेंनी अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन अनेक वर्ष राजकारण केले. तेच काम आता मोठ्या नेटाने पुढे घेऊन जाण्याचे काम विरोधी पक्षात कोण करत आहे, असे बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला विचारले तर तुम्हाला कोणीही सांगेल. गोपीनाथ मुंडेच्यानंतर धनंजय मुंडे हे समर्थपणे काम करत आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. ते बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवने यांच्या प्रचारासाठी आष्टी येथील जाहीर सभेत बोलत होते.

बीड जिल्ह्यातील जनता प्रगल्भ आहे. आपल्यासाठी तळमळीने काम कोण करते हे त्यांना चांगलेच कळते. लोकसभेच्या प्रचारात पंकजा मुंडे या आम्हीच गोपीनाथ मुंडे यांचा वारसा व विचार पुढे घेऊन जात असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र, गोपीनाथ मुंडे यांचे विचार व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे कसब धनंजय मुंडे यांच्यात आहे, अशी गुगली पवार यांनी सभेत बोलताना टाकली आहे. बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी आज आष्टी येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी मंचावर विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती.

मी सत्ताधारी पक्षाचा मंत्री होतो. तेव्हा गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षात होते. अनेक वेळा आमची शाब्दिक चकमकही झाली. मात्र, व्यक्तिगत संबंध कधीच बिघडले नाहीत. त्यांच्या निधनानंतर आम्ही बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार द्यायचा नाही, असे ठरवले होते. ही गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलची आमची श्रद्धा होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू असलेल्या शिष्यवृत्तीला आम्ही २५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे पवार म्हणाले.

बीड जिल्हा कष्टकऱ्यांचा सन्मान करणारा जिल्हा आहे. म्हणूनच बजरंग सोनवणे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन एका प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. हा जिल्हा नक्कीच बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Intro:बातमी चे फोटो डेस्क च्या व्हाट्सअप ग्रुप वर सेंड केले आहेत....
****************

बीड लोकसभा: गोपीनाथ मुंडे यांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम धनंजय मुंडे करत आहे; शरद पवार यांनी बीडमध्ये टाकली गुगली

बीड- बीड जिल्ह्यातील जनता प्रगल्भ आहे आपल्यासाठी तळमळीने काम कोण करते हे त्यांना कळते. गोपीनाथ मुंडेंनी अठरापगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन अनेक वर्ष राजकारण केलं तेच काम आता मोठ्या नेटाने पुढे घेऊन जाण्याचे काम विरोधी पक्षात कोण करत असेल असं बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला विचारले तर तुम्हाला कोणीही सांगेल की, गोपीनाथ मुंडे च्या नंतर धनंजय मुंडे हे समर्थपणे काम करत आहेत. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केले. लोकसभेच्या प्रचारात पंकजा मुंडे या आम्हीच गोपीनाथ मुंडे यांचा वारसा व विचार पुढे घेऊन जात असल्याचे वारंवार सांगत असतानाच शरद पवार येथील सभेत म्हटले की, गोपीनाथ मुंडे यांचे विचार व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा कसब धनंजय मुंडे यांच्यात आहे अशी गुगली टाकली आहे .गुगली किती परिणाम करेल हे लोकसभा निवडणुकीच्या मतदानात समजेल.

Body:बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी रविवारी आष्टी येथे घेण्यात आलेल्या जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी मंचावर विधान परिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची उपस्थिती होती. मी सत्ताधारी पक्षाचा मंत्री होतो. तेव्हा गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षात होते. अनेक वेळा आमची शाब्दिक चकमकही झाली. मात्र व्यक्तिगत संबंध कधीच पडले नाहीत त्यांच्या निधनानंतर आम्ही बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार द्यायचा नाही, असे ठरवले होते. ही एक गोपीनाथ मुंडे यांच्या बद्दलची आमची श्रद्धा होती. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने सुरू असलेल्या शिष्यवृत्तीला आम्ही 25 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे.

Conclusion:बीड जिल्हा कष्टकऱ्यांचा सन्मान करणारा जिल्हा आहे म्हणूनच बजरंग सोनवणे यांना लोकसभेची उमेदवारी देऊन एका प्रस्थापित नेत्यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. हा जिल्हा नक्कीच बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास शरद पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. रंग दिसायला दिसतोय साधा पण तू खरंच या लोकसभा निवडणुकीत घेतल्याशिवाय राहणार नाही असेही ते म्हणाले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.