ETV Bharat / state

Gram Panchayat Election 2022 : ईव्हीएम मशीनमध्ये फेविक्विक टाकल्याने पुन्हा मतदान; लगेच मतमोजनीही होणार - Voter Dropped Faviquik Into EVM Machine

लिंबागणेश ग्रामपंचायतीतील केवळ प्रभाग क्रमांक 2 साठी मतदान होत (Low Voting in Limbaganesh Gram Panchayat ) आहे. एका मतदाराने मतदान करताना ईव्हीएम मशीनमध्ये फेव्हिक्विक टाकल्याचा प्रकार ( Voter Dropped Faviquik Into EVM Machine ) घडला. त्यामुळे आज पुन्हा मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

Revoting in Limbaganesh Gram Panchayat
लिंबागणेश ग्रामपंचायतीत पुन्हा मतदान
author img

By

Published : Dec 23, 2022, 1:16 PM IST

लिंबागणेश ग्रामपंचायतीत पुन्हा मतदान

बीड : जिल्ह्यात 671 ग्रामपंचायतींची मतदान प्रक्रिया पूर्ण (Gram Panchayat Election 2022 ) झाली. त्यामध्ये बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील ग्रामपंचायतीसाठी मतदान होत असताना ईव्हीएम मशीनमध्ये फेव्हिक्विक टाकल्याचा प्रकार घडला. त्यामुळे आज पुन्हा मतदान प्रक्रिया पार पडत ( Revoting In Limbaganesh Gram Panchayat ) आहे.

प्रभाग क्रमांक 2 मध्ये मतदान : बीड तालुक्यातील लिंबागणेश ग्रामपंचायतीसाठी आज केवळ प्रभाग क्रमांक 2 मधील मतदारांना मतदान करता येणार आहे. 18 डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक 2 मधील एका मतदाराने मतदान करताना ईव्हीएम मशीनमध्ये फेव्हिक्विक टाकल्याचा प्रकार ( Voter Dropped Faviquik Into EVM Machine ) घडला. या प्रकारामुळे बीड शहरातील आयटीआय येथे बीड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले. मात्र लिंबागणेश ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली नव्हती. त्यामुळे 23 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत लिंबागणेश ग्रामपंचायतीतील केवळ प्रभाग क्रमांक 2 साठी मतदान होणार (Low Voting in Limbaganesh Gram Panchayat ) आहे. मतदान झाल्यानंतर रात्री 8.00 वाजता बीड शहरातील आरटीआय येथे ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार आहे.

फेविक्विक टाकून ते बटन बंद : लिंबागणेश ग्रामपंचायततील प्रभाग क्रमांक 2 येथे बी यु पी नंबर 43461 च्या बटणावर फेविक्विक टाकून ते बटन बंद करण्यात आले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर दुसरी बॅलेट युनिट मशीन सुरू करण्याच्या प्रक्रियेला 1 तास 25 मिनिटे कालावधी लागला होता झोनल अधिकारी व केंद्राध्यक्ष यांनी बॅलेट युनिट क्रमांक पी 38450 हे दुसरे मशीन जोडून मतदान प्रक्रिया सुरू केली होती परंतु या मतदान केंद्रावर इतर दोन केंद्रापेक्षा कमी मतदान झाले असल्याने ही बाब राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात आली होती त्यानंतर प्रभाग क्रमांक 2 मध्ये फेरनिवड घेण्याचा आदेश राजे निवडणूक विभागाने जिल्हा प्रशासनाला दिला होता त्यानुसार २३ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक 2 साठी फेर मतदान घेऊन त्याचे आजच रात्री 8.00 वाजता निकाल घोषित होणार आहेत जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत निवडणुकीच्या निकालाची अधिसूचित प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक २६ डिसेंबर आहे दरम्यान याप्रकरणी केंद्रप्रमुखाच्या फिर्यादीवरून ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये आता सुरुवातीच्या 229 मतदारांची तपासणी केली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.