ETV Bharat / state

केंद्रीय पथकाकडून बीडच्या आरोग्य विभागाचा आढावा; उपचाराबाबत केल्या सूचना - जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गित्ते

बीड जिल्ह्यातील वार्ता कोरोना व चिंताजनक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुरुवारी केंद्रीय पथक बीडमध्ये दाखल झाले होते. दिल्ली येथील आरोग्य विभागाच्या तज्ञ डॉ. रक्षाकुंडल यांनी जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डमधील परिस्थितीची पाहणी करत बीड जिल्हा आरोग्य विभागाकडून होत असलेली उपचार पद्धती बरोबर आहे का? याची पाहणी करत उपचारा संदर्भाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गित्ते यांना सूचना दिल्या.

केंद्रीय पथकाकडून बीडच्या आरोग्य विभागाचा आढावा; उपचाराबाबत केल्या सूचना

author img

By

Published : Apr 8, 2021, 4:43 PM IST

बीड - बीड जिल्ह्यातील वार्ता कोरोना व चिंताजनक परिस्थिती चा आढावा घेण्यासाठी गुरुवारी केंद्रीय पथक बीडमध्ये दाखल झाले होते. दिल्ली येथील आरोग्य विभागाच्या तज्ञ डॉ. रक्षाकुंडल यांनी जिल्हा रुग्णालयातील कोरोना वार्डमधील परिस्थितीची पाहणी करत बीड जिल्हा आरोग्य विभागाकडून होत असलेली उपचार पद्धती बरोबर आहे का? याची पाहणी करत उपचारा संदर्भाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सूर्यकांत गित्ते यांना सूचना दिल्या.

याप्रसंगी बीडचे जिल्हाधिकारी आर. एस. जगताप, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, उपजिल्हाधिकारी नामदेव टिळेकर, जिल्हा शल्य चिकित्सक सूर्यकांत गित्ते, अधिपरिचारिका संगिता दिंडकर आदींची उपस्थिती होती.

केंद्रीय पथकाकडून बीडच्या आरोग्य विभागाचा आढावा; उपचाराबाबत केल्या सूचना

डॉक्टर देत असलेले उपचार योग्य आहेत-

यावेळी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना केंद्रीय पथकातील डॉ. रक्षाकुंडल म्हणाल्या की, बीड जिल्हा आरोग्य विभाग यांच्याकडून कोरोना पॉझिटिव रुग्णांना देत असलेली उपचार पद्धती योग्य आहे. बीड जिल्ह्यातील इतर ठिकाणचा आरोग्याबाबत आढावा घेतल्यानंतर उपचारा संबंधी योग्य त्या सूचना आम्ही करणार आहोत. आज मी बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड वार्ड मधील उपचारा संबंधीची पाहणी केली आहे. येथील डॉक्टर देत असलेले उपचार योग्य आहेत, असे डॉ. रक्षाकुंडल म्हणाल्या.

चार हजार पेक्षा अधिक सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण-

बीड जिल्ह्यात आज घडीला चार हजार पेक्षा अधिक सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. प्रत्येक दिवसाला जिल्ह्यात पाचशे ते सातशे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत बीड जिल्ह्यात 28 हजार नागरिकांना कोरोना होऊन गेला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येण्याचा रेट 9.35 टक्के एवढा आहे. तर मृत्यूदर 2.9 एवढा आहे. कोरोना पॉझिटिव रुग्णांची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना मिळावी, या उद्देशाने केंद्रीय पथकाने बीड जिल्ह्यात गुरुवारी दौरा केला.

हेही वाचा- ऐन महामारीत डाळीसह पालेभाज्या महाग; गृहिणींचे कोसळले बजेट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.