ETV Bharat / state

बीडमध्ये होणार चंद्रावरील खनिजांसंदर्भातील माहितीवर संशोधन - miliya college

भारताने नुकतेच चांद्रयान-2 हे यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर सोडले आहे. हे यान चंद्रावर पोहोचल्यानंतर जी माहिती इस्रोला देणार आहे, यापैकी चंद्रावरील खनिजासंदर्भातील माहितीवर होणारे संशोधन हे बीडमधील मिलिया महाविद्यालयात होणार आहे.

डॉ. सय्यद शफियोद्दीन आणि झिशान शेख
author img

By

Published : Jul 24, 2019, 4:05 PM IST

Updated : Jul 24, 2019, 5:18 PM IST

बीड - भारताने नुकतेच चांद्रयान-2 हे यान पृथ्वीच्या कक्षेबाहेर सोडले आहे. हे यान चंद्रावर पोहोचल्यानंतर जी माहिती इस्रोला देणार आहे, यापैकी चंद्रावरील खनिजासंदर्भातील माहितीवर होणारे संशोधन हे बीडमधील मिलिया महाविद्यालयात होणार आहे. यासाठी बीडच्या मिलिया महाविद्यालयात विशेष कॉम्प्युटर लॅब देखील तयार करण्यात आली आहे.

भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सय्यद शफियोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली त्यांची टीम यावर संशोधन करणार आहे. चांद्रयान - 2 मोहिमेत भारताने सोमवारी चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवले आहे. चंद्राच्या दिशेने झेपावलेले हे यान चंद्रावरून विविध प्रकारची माहिती इस्रोला पाठविणार आहे. यातील चंद्रावरील खनिजांसंदर्भातील माहितीवरील संशोधन बीडमध्ये होणार आहे.

बीडमध्ये होणार चंद्रावरील खनिजांसंदर्भातील माहितीवर संशोधन

या संशोधनासाठी इस्रो कक्षाची स्थापनाही महाविद्यालयात करण्यात आली आहे. यापूर्वीच्या चांद्रयान - 1 मोहिमेच्या माहितीचे विश्लेषण करण्यात देखील डॉ. सय्यद शफियोद्दीन यांचा सहभाग होता. तसेच ते नासा आणि इस्रोच्या एका संयुक्त प्रकल्पावर देखील काम करीत आहेत.

चांद्रयान - 2 हे सोमवारी चंद्राच्या दिशेने झेपावल्यानंतर या मोहिमेचा बीड जिल्ह्याशी असलेला संबंध समोर आला आहे. चांद्रयान-2 च्या संदर्भाने इस्रोने लुनार सायन्स क्षेत्रात काम करणार्‍या देशभरातील 60 शास्त्रज्ञांना एकत्र केले. यात चांद्रयानाकडून मिळणार्‍या माहितीचे विश्लेषण करण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांच्या या पथकावर सोपवण्यात आली आहे. चांद्रयान-1 मोहिमेत चंद्रावर काही संयुगांच्या रूपात पाणी असल्याचा शोध लागलेला आहे. आता चंद्रावरील खनिजांची माहिती या मोहिमेतून घेण्यात येणार असून, त्या माहितीवर बीडमध्ये डॉ. सय्यद शफियोद्दीन विश्लेषण करणार आहेत.

या मोहिमेतील मिनरल (खनिज) मॅपिंग करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या प्रकल्पावर त्यांच्यासोबत झिशान शेख हे देखील रिसर्च फेलो म्हणून काम करत आहेत. 2015 पासून डॉ. सय्यद शफियोद्दीन हे इस्रोशी संबंधित असून चांद्रयान- 1 मोहिमेतही माहितीच्या विश्लेषणाशी ते संबंधित होते. देशातील ज्या मोजक्या लोकांना हे काम करण्याची संधी मिळाली, त्यापैकी एक असणारे डॉ. सय्यद शफियोद्दीन हे मुळचे पाटोद्याचे आहेत. सध्या ते मिलिया महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक व संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.

Intro:
बाईट- 1) प्रा. डॉ. सय्यद शफियोद्दीन
2) प्रा. अजितकुमार यादव
3) प्रा. ईशान
*********
बीड मध्ये होणार चंद्रावरील खनिजांसंदर्भातील माहितीवरील संशोधन....

बीड- भारताने नुकतेच चंद्रयान 2 हे यान पृथ्वीच्या कक्षाबाहेर सोडले आहे. चंद्राच्या दिशेने झेपावलेले हे चंद्रयान2 चंद्रावर पोहोचल्यानंतर जी माहिती इस्रोला देणार आहे. यापैकी चंद्रावरील खनिजसंदर्भातील माहिती वर होणारे संशोधन हे बीड मधील मिलिया महाविद्यालयात होणार आहे. विशेष म्हणजे यासाठी बीड च्या या महाविद्यालयात विशेष कॉम्प्युटर लॅब देखील तयार करण्यात आली आहे. भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ सय्यद शफियोद्दीन यांच्या नेतृत्वाखाली त्यांची टीम यावर संशोधन करणार आहे.

चांद्रयान 2 मोहिमेत भारताने सोमवारी चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेबाहेर पाठवले आहे. चंद्राच्या दिशेने झेपावलेले हे यान चंद्रावरून विविध प्रकारची माहिती इस्रो ला पाठविणार असून यातील चंद्रावरील खनिजांसंदर्भातील माहितीवरील संशोधन बीड येथे होणार आहे. बीडच्या मिलिया महाविद्यालयातील भौतिकशास्त्राचे प्राध्यापक व संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ सय्यद शफियोद्दीन आणि त्यांची टीम यावर संशोधन करणार आहे.

यासाठी एका इस्रो कक्षाची स्थापना देखील मिलिया महाविद्यालयात करण्यात आली आहे. यापूर्वीच्या चांद्रयान 1 मोहिमेच्या माहितीचे विश्लेषण करण्यात देखील डॉ. सय्यद शफियोद्दीन यांचा सहभाग होता. तसेच ते नासा आणि इस्रोच्या एका संयुक्त प्रकल्पावर देखील काम करीत आहेत.
चांद्रयान 2 सोमवारी चंद्राच्या दिशेने झेपावल्यानंतर या मोहिमेचा बीड जिल्ह्याशी असलेला संबंध आता समोर आला आहे. चांद्रयान-2 च्या संदर्भाने इस्रोने लुनार सायन्स क्षेत्रात काम करणार्‍या देशभरातील 60 शास्त्रज्ञांना एकत्र केले. यात चांद्रयानाकडून मिळणार्‍या माहितीचे विश्लेषण करण्याची जबाबदारी शास्त्रज्ञांच्या या पथकावर सोपवण्यात आली आहे. चांद्रयान 1 मोहिमेत चंद्रावर काही संयुगांच्या रूपात पाणी असल्याचा शोध लागलेला आहे. आता चंद्रावरील खनिजांची माहिती या मोहिमेतून घेण्यात येणार असून त्या माहितीवर बीडमध्ये डॉ.सय्यद शफियोद्दीन विश्लेषण करणार आहेत.

या मोहिमेतील मिनरल (खनिज) मॅपिंग करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. या प्रकल्पावर त्यांच्यासोबत झिशान शेख हे देखील रिसर्च फेलो म्हणून काम करत आहेत.
2015 पासून डॉ सय्यद शफियोद्दीन हे इस्रोशी संबंधित असून चांद्रयान 1 मोहिमेतही माहितीच्या विश्लेषणाशी ते संबंधित होते. देशातील ज्या मोजक्या लोकांना हे काम करण्याची संधी मिळाली त्यापैकी एक असणारे डॉ. सय्यद शफियोद्दीन हे मुळचे पाटोद्याचे असून सध्या मिलिया महाविद्यालयात भौतिकशास्त्राचे सहा. प्राध्यापक व संगणक शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत.
डॉ. सय्यद शफियोद्दीन यांच्या बरोबर प्रा. ईशान व अजितकुमार यादव हे देखील या मोहिमेत काम करत आहेत...

Body:बConclusion:ब
Last Updated : Jul 24, 2019, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.