ETV Bharat / state

कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र अॅक्शन प्लॅन तयार करा; प्रितम मुंडे यांच्या सूचना

आरोग्य यंत्रणेवरील तणाव कमी करायचा असेल तर जिल्हास्तरावर स्वतंत्र नियोजन करण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात खा. प्रीतम मुंडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेतली.

author img

By

Published : Apr 19, 2021, 9:51 PM IST

प्रीतम मुंडे
प्रीतम मुंडे

बीड - रुग्णसंख्येत झालेल्या चिंताजनक वाढीने आरोग्य यंत्रणेवर अभूतपूर्व तणाव निर्माण झाला आहेे. यंत्रणेवरील तणाव कमी करायचा असेल तर जिल्हास्तरावर स्वतंत्र नियोजन करण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात खा. प्रीतम मुंडे यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेतली. रुग्णसंख्या कमी करण्यासह दर्जेदार सुविधा देण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र अॅक्शन प्लॅन तयार करा अशा सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.

आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी विविध कोरोना रुग्णालयांना भेटी देऊन खा.प्रीतम मुंडे यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली होती. पाहणी दरम्यान निदर्शनास आलेल्या त्रुटी आणि असुविधांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. तर केवळ अंबाजोगाई रुग्णालयात आरटीपीसीआर चाचण्यांचे निदान होत असल्याने बीड येथे आरटीपीसीआर चाचणी केंद्राची आवश्यकता आहे.

यासंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रकृती अवस्था गंभीर असलेल्या रुग्णांवर जिल्ह्यातील प्रमुख रुग्णालयात उपचार होत आहेत. तालुकास्तरावर उपचार सुविधा मिळाल्या तर त्यांच्यावरील भार कमी होईल. यासंदर्भात गाईडलाईन्स तयार करा, खाजगी वैद्यकीय तज्ञांच्या सेवेने यंत्रणेवरील तणाव कमी होईल, त्यांच्याशी समन्वय साधून मदत मिळवा. रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे रुग्णांची आर्थिक लूट होत आहे, याबाबत कठोर कारवाई व्हावी. यंत्रणेवरील भार कमी करण्यासाठी नॉन कोविड रुग्णांवर खाजगी दवाखान्यात उपचार करावेत व आष्टी येथील कोरोना सेंटरमध्ये सुरक्षा रक्षक नियुक्त करावा, अशा सूचना प्रीतम मुंडे यांनी केल्या.

तर यंत्रणेचा उपयोग काय ?

कोरोना सेंटरमधील सुविधांबाबत रुग्णांच्या तक्रारी आहेत.अनेक रुग्णालयात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. रुग्णालयात मिळणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा निकृष्ट असल्याचे रुग्णांनी सांगितले. कोरोनाने त्रस्त असलेल्या रुग्णांना सुविधा मिळत नसतील. तर जिल्ह्यातील यंत्रणेचा उपयोग तरी काय असा संतप्त सवाल खा.प्रीतम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला. रुग्णांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण व्हावे आणि यंत्रणेतील त्रुटींवर उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.