ETV Bharat / state

जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था, शाळा खोली नसल्याने लिंबाच्या झाडाखालीच भरते शाळा - बीड मधील शाळेची वाईट अवस्था

बीड शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कोथळे वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची वाईट अवस्था आहे. ही शाळा लिंबाच्या झाडाखालीच भरत असल्याचे समोर आले आहे.

poor-condition-of-zilla-parishad-school-in-beed-district
जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था
author img

By

Published : Feb 11, 2020, 10:44 AM IST

बीड - शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेला कोथळे वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची अत्यंत दळभद्री अवस्था आहे. या शाळेला ना शाळा खोली आहे. ना विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी आहे. वरवटी गावच्या शिवारात डोंगराच्या पायथ्या खाली ही शाळा भरते. पहिली ते पाचवी पर्यंत दोन शिक्षकी असलेल्या या शाळेत 25 एवढी पटसंख्या आहे. 2013 मध्ये ही शाळा कोथळे वस्ती येथे सुरू झाली. मागच्या चार वर्षापासून शाळा खोल्यांची मागणी केलेली असताना देखील जिल्हा प्रशासनाकडून कोठुळे वस्ती येथील शाळेला आजवर शाळा खोली मिळाली नाही. ना विद्यार्थ्यांसाठी कुठल्या सुविधा मिलाळ्या आहेत. ऊन, वारा, पाऊस काहीही असो या विद्यार्थ्यांना उघड्यावरच ज्ञानार्जन करावे लागत असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक डी. एल. वारे यांनी सांगितले.

जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था

बीड शहराच्या जवळ असलेल्या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळेची अशी अवस्था आहे, तर दुर्गम भागात काय असेल याची कल्पना न केलेली बरी. दोन वर्षांपूर्वी शाळाखोल्यांसाठी जिल्हा परिषदेने विशेष निधी खर्च केल्याचे सांगितले होते. मात्र, हा निधी कुठे आणि कसा खर्च झाला असा प्रश्न या वस्तीवरील शाळा पाहून निर्माण होत आहे. मुख्याध्यापक डी. एल. वारे यांनी मागील चार वर्षापासून शाळा खोल्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. मात्र, अद्याप पर्यंत त्यांना शाळेला खोल्या मिळालेल्या नाहीत. या अशा बिकट परिस्थितीत कोठुळे वस्तीवरील विद्यार्थी मात्र उघड्यावर शिक्षण घेत आहेत. शहरी भागात रंगीबेरंगी इमारतींमध्ये भरणाऱ्या शाळांच्या तुलनेत कोठुळे वस्ती येतील या जिल्हा परिषदेच्या शाळेला शाळा खोल्या मिळणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कोठुळे वस्ती येथील शाळे कडे जिल्हा परिषदेने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी शिक्षण प्रेमींकडून होत आहे.

Intro:जिल्हा परिषद शाळेची दुरावस्था; शाळा खोली नसल्याने लिंबाच्या झाडाखालीच भरते शाळा

बीड- शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेला कोथळे वस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची अत्यंत दळभद्री अवस्था आहे. या शाळेला ना शाळा खोली आहे.. ना विद्यार्थ्यांना पिण्यासाठी पाणी आहे. वरवटी गावच्या शिवारात डोंगराच्या पायथ्या खाली ही शाळा भरते. पहिली ते पाचवी पर्यंत दोन शिक्षकी असलेल्या या शाळेत 25 एवढी पटसंख्या आहे. 2013 मध्ये ही शाळा कोथळे वस्ती येथे सुरू झाली. मागील चार वर्षापासून शाळा खोल्यांची मागणी केलेली असताना देखील जिल्हा प्रशासनाकडून कोठुळे वस्ती येथील शाळेला आजवर शाळा खोली मिळाली नाही. ना विद्यार्थ्यांसाठी कुठल्या सुविधा.. ऊन, वारा, पाऊस काहीही असो या विद्यार्थ्यांना उघड्यावरच ज्ञानार्जन करावे लागत असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक डी. एल. वारे यांनी सांगितले.

Body:बीड शहराच्या जवळ असलेल्या गावांमध्ये जिल्हा परिषद शाळेची अशी अवस्था आहे तर दुर्गम भागात काय असेल याची कल्पना न केलेली बरी. दोन वर्षांपूर्वी शाळाखोल्या यासाठी जिल्हा परिषदेने विशेष निधी खर्च केल्याचे सांगितले होते. मात्र हा निधी कुठे आणि कसा खर्च झाला असा प्रश्न या वस्तीवरील शाळा पाहून निर्माण होत आहे. मुख्याध्यापक डी. एल. वारे यांनी मागील चार वर्षापासून शाळा खोल्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. मात्र अद्याप पर्यंत त्यांना शाळेला खोल्या मिळालेल्या नाहीत. या अशा बिकट परिस्थितीत कोठुळे वस्तीवरील विद्यार्थी मात्र उघड्यावर शिक्षण घेत आहेत. शहरी भागात रंगीबेरंगी इमारतींमध्ये भरणाऱ्या शाळांच्या तुलनेत कोठुळे वस्ती येतील या जिल्हा परिषदेच्या शाळेला शाळा खोल्या मिळणार आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Conclusion:कोठुळे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळे कडे जिल्हा परिषद यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी शिक्षण प्रेमी कडून होत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.