बीड - एका मंत्र्यांच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशीराने का होईना ओलांडली. आता निष्पक्षपातीपणे चौकशीचा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे, असे ट्विट करत पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी निष्पक्षपातीपणे व्हावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केली आहे.
वनमंत्री संजय राठोड यांनी रविवारी आपला राजीनामा मुख्यमंत्र्याकडे सादर केला. यावर भाष्य करताना पंकजा मुंडे यांनी ट्विट केले आहे. 'एका मंत्र्यांच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशीराने का होईना ओलांडली, आता निष्पक्षपातीपणे चौकशीचा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे. सरकारच्या इतिहासात महिलांबद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - नऊ दिवसानंतर परळी वीज केंद्रातून वीजनिर्मिती