ETV Bharat / state

जयदत्त क्षीरसागर यांनी दिला आमदारकीचा राजीनामा; बीडला मिळणार मंत्रीपद? - haribhau bagade

येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात क्षीरसागर यांच्या रूपाने बीडला मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. एवढेच नाही तर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील शिवसेनेच्या कोट्यातून क्षीरसागर यांना मिळणार आहे.

जयदत्त क्षीरसागर यांनी दिला आमदारकीचा राजीनामा
author img

By

Published : May 22, 2019, 3:24 PM IST

बीड - माजी बांधकाम मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला. ते सायंकाळी शिवसेनेत प्रवेश करणार असून येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात क्षीरसागर यांच्या रूपाने बीडला मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. एवढेच नाही तर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील शिवसेनेच्या कोट्यातून क्षीरसागर यांना मिळणार आहे. क्षीरसागर यांच्या राजीनाम्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारणात कही खुशी कही गम असे चित्र पाहायला मिळाले.

मागील तीन वर्षापासून जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होते. बीड विधानसभा मतदारसंघातून पुतणे संदीप क्षीरसागर यांनी उमेदवारीबाबत दावा केल्याने जयदत्त क्षीरसागर यांची पक्षाकडून कोंडी केली होती. अखेर या सगळ्या कटकारस्थानाला कंटाळून जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या या राजीनाम्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

दिवंगत केशर काकू क्षीरसागर यांच्या पासूनच सकारात्मक राजकारण करणारे नेते म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. ओबीसी नेते म्हणून देखील मराठवाड्यात जयदत्त क्षीरसागर प्रभाव पाडू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने आलेले धनंजय मुंडे यांना पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेसने जयदत्त क्षीरसागर यांना दुखावले असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला बीड जिल्ह्यात जयदत्त क्षीरसागर यांच्या नाराजीचा फटका बसू शकतो. सध्या मात्र जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने बीड जिल्ह्याला मंत्रीपद मिळत असल्याने जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यकर्ते खुश आहेत.

Intro:खालील बातमीतील जयदत्त क्षीरसागर यांचा आमदारकीचा राजीनामा देताना चा फोटो मेल केला आहे
**************
जयदत्त क्षीरसागर यांनी दिला आमदारकीचा राजीनामा; क्षीरसागर यांच्या रूपाने बीडला मिळणार मंत्रीपद

बीड- माझी बांधकाम मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्येष्ठ नेते जयदत्त क्षीरसागर यांनी बुधवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्त केला. सायंकाळी शिवसेनेत प्रवेश करणार असून येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तार जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने बीडला मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. एवढेच नाही तर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देखील शिवसेनेच्या कोट्यातून क्षीरसागर यांना मिळणार आहे. क्षीरसागर यांच्या राजीनाम्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारणात कही खुशी कही गम असे चित्र पाहायला मिळाले.

Body:मागील तीन वर्षापासून जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज होते. बीड विधानसभा मतदारसंघातून पुतणे संदीप क्षीरसागर यांनी उमेदवारीबाबत दावा केल्याने जयदत्त क्षीरसागर यांची पक्षाकडून कोंडी केली होती. अखेर या सगळ्या कटकारस्थानाला कंटाळून जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या या राजीनाम्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.

Conclusion:स्वर्गीय केशर काकू शिरसागर यांच्या पासूनच सकारात्मक राजकारण करणारे नेते म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख आहे. ओबीसी नेते म्हणून देखील मराठवाड्यात जयदत्त क्षीरसागर प्रभाव पाडू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने आलेले धनंजय मुंडे यांना पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेसने जयदत्त क्षीरसागर यांना दुखावले असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला बीड जिल्ह्यात जयदत्त क्षीरसागर यांच्या नाराजीचा फटका बसू शकतो. सध्या मात्र जयदत्त क्षीरसागर यांच्या रूपाने बीड जिल्ह्याला मंत्रीपद मिळत असल्याने जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यकर्ते खुश आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.