ETV Bharat / state

बीडमधील डॉक्टरांना मुंबईला नेऊ देणार नाही; नंदकिशोर मुंदडा यांचा स्वराती रुग्णालयासमोर ठिय्या

शासनाने बीड जिल्ह्यातील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय विद्यालय, अंबाजोगाई येथील 56 डॉक्टरांना मुंबई येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी विरोध केला आहे.

author img

By

Published : May 30, 2020, 1:29 PM IST

बीड
बीड

बीड - जिल्ह्यातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय येथील 56 डॉक्टरांना मुंबईतील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी घेऊन जाण्याच्या शासनाच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी विरोध केला आहे. नंदकिशोर मुंदडा यांनी रुग्णालयाच्या समोरच शनिवारी ठिय्या मांडला आहे. जोपर्यंत येथील रुग्णालयात पर्यायी व्यवस्था निर्माण केली जाणार नाही, तोपर्यंत अंबाजोगाई येथील स्वराती मधील डॉक्टरांना मुंबईला जाऊ देणार नाही, अशी भूमिका मुंदडा यांनी घेतली आहे.

सध्या महाराष्ट्रात रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यामध्ये बीड जिल्ह्यात देखील दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत शासनाने बीड जिल्ह्यातील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय विद्यालय, अंबाजोगाई येथील 56 डॉक्टरांना मुंबई येथे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या सूचना देखील संबंधित डॉक्टरांना दिलेल्या आहेत.

कुठल्याही क्षणी अंबाजोगाई येथील स्वरातीमधील डॉक्टर मुंबईला हलविले जाऊ शकतात. या शासनाच्या निर्णयाला आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे व सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांच्यासह बीड जिल्हा वासियांनी विरोध केला आहे. बीडमध्ये बिकट परिस्थिती निर्माण होत असताना येथील डॉक्टर मुंबईला घेऊन जाऊन बीड जिल्हा वाऱ्यावर सोडायचा आहे का? असा सवाल त्यांनी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.