बीड - मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुर्ती स्थगिती दिली आहे. खऱ्या अर्थाने मराठा समाजातील मुला-मुलींसाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. या आघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यावे, असे वाटतच नव्हते. अत्यंत निंदनीय ही बाब आहे. अखेर आघाडी सरकारची इच्छा पूर्ण झाली आहे, असा आरोप आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.
जर मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी अशा प्रकारे अडथळे निर्माण केले जात असतील तर मराठा समाज या आघाडी सरकारला कधीच माफ करणार नाही, असा इशारा देखील आमदार विनायक मेटे यांनी यावेळी दिला आहे.
हेही वाचा - सुदाम मुंडेला परळी न्यायालयाने सुनावली 5 दिवसांची पोलीस कोठडी