ETV Bharat / state

ऊसतोड मजुरांना योग्य दर दिला नाही तर कारखाने सुरू होऊ देणार नाही - सुरेश धस - सुरेश धस साखर कारखाना मालक इशारा

येणाऱ्या गळीत हंगामामध्ये ऊसतोड मजूर व मुकादम यांना ऊस तोडणीसाठी चांगले दर मिळावेत, या उद्देशाने शिरूर कासार येथे बैठक झाली. या बैठकीला आमदार सुरेश धस, श्रीमंत जायभाय, सुरेश वनवे, भाऊसाहेब आंधळकर, केशवराव आंधळकर यांच्यासह मुकादम, ऊसतोड मजूर यांची उपस्थिती होती.

Suresh Dhas
सुरेश धस
author img

By

Published : Sep 3, 2020, 2:55 PM IST

बीड - आजपर्यंत ऊसतोड मजूर व मुकादम यांच्या जीवावर साखर कारखान्यांच्या मालकांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले, असा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला. येणाऱ्या गळीत हंगामामध्ये ऊसतोड मजूर व मुकादम यांना ऊस तोडणीसाठी चांगले दर मिळावेत, या उद्देशाने शिरूर कासार येथे बैठक झाली. त्या बैठकीत धस बोलत होते.

ऊसतोड मजुरांना योग्य दर दिला नाही तर कारखाने सुरू होऊ देणार नाही

या बैठकीला आमदार सुरेश धस, श्रीमंत जायभाय, सुरेश वनवे, भाऊसाहेब आंधळकर, केशवराव आंधळकर यांच्यासह मुकादम, ऊसतोड मजूर यांची उपस्थिती होती. यावेळी 2020-21या वर्षाच्या गळीत हंगामात ऊस तोडणी दर वाढवून घेण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

मागील अनेक वर्षापासून ऊसतोड मजुरांना व मुकादमांना ऊसतोडणीसाठी अत्यल्प दर दिला जातो. बैलगाडी असेल तर 208 रुपये प्रति टन कारखाना भाव देते. 17 ते 18 तास काम करूनही एका मजूराला दिवसाकाठी फक्त आठशे रुपये मिळतात. हा अन्याय ऊसतोड मजुरांवर अनेक वर्षापासून होत आहे. यावर्षी, मात्र ऊस तोडणीच्या दरामध्ये दुपटीने वाढ झाली नाही तर बीड जिल्ह्यातून एकही ऊसतोड कामगार ऊस तोडणीला जाणार नाही. याची दक्षता प्रत्येक ऊसतोड मुकादम संघटनेने घ्यावी, असे आवाहन आमदार धस यांनी यावेळी केले.

पश्चिम महाराष्ट्र आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करतो -

यंदा राज्यात चांगला पाऊस झाला आहे. उसाचे क्षेत्रही बऱ्यापैकी आहे. त्यामुळे आपल्या मागण्या पदरात पडल्या तरच हातात कोयता घ्या. आजपर्यंतचा इतिहास आहे की, पश्चिम महाराष्ट्रातूनच ऊस तोडणी मजूर व मुकादम यांची आंदोलने दडपली गेली आहेत. त्यामुळे जरा सावध होऊन आपले आंदोलन यशस्वी करू. ऊसतोड मजूर व मुकादम यांना न्याय मिळवून देण्यासाठी माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत. सगळ्या ऊसतोड मजूर संघटनांनी आपल्या निर्णयावर ठाम राहावे, असे आवाहन आमदार धस यांनी केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.