ETV Bharat / state

आमदार समर्थकांनी पंकजा मुंडेंचे भाषण रोखले; गेवराई जागा देण्याची केली मागणी

शनिवारी गेवराई येथे पंकजा मुंडे जाहीर सभेत भाषण करताना आमदार लक्ष्मण पवारांच्या समर्थकांनी मुंडेंचे भाषण मध्येच थांबवले. अगोदर पवार यांना गेवराई विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा शब्द द्या, नंतर पुढे बोला, असा आक्रमक पवित्रा पवारांच्या कार्यकर्त्यांनी घेतला. यामुळे मुंडे यांची भर सभेत गोची झाली.

मंत्री पंकजा मुंडे
author img

By

Published : Mar 9, 2019, 9:42 PM IST

बीड - मागील वर्षभरापासून मंत्री पंकजा मुंडे आणि गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण पवार यांच्यात राजकीय दुरावा वाढत आहे. शनिवारी गेवराई येथे पंकजा मुंडे जाहीर सभेत भाषण करताना पवारांच्या समर्थकांनी मुंडेंचे भाषण मध्येच थांबवले. अगोदर पवार यांना गेवराई विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा शब्द द्या, नंतर पुढे बोला, असा आक्रमक पवित्रा पवारांच्या कार्यकर्त्यांनी घेतला. यामुळे मुंडे यांची भर सभेत गोची झाली.

मंत्री पंकजा मुंडे

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लोकार्पण सोहळ्यानिमित्त शनिवारी गेवराई येथे कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पंकजा मुंडे बोलत होत्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण होणार होते. मात्र, अचानक गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा बीड जिल्हा दौरा रद्द झाला. यानंतर मुंडे यांच्या उपस्थितीत धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. याप्रसंगी पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मुंडे यांचे भाषण सुरू असतानाच पवार यांना गेवराई विधानसभा उमेदवारीचा शब्द द्या, नंतर बाकीचे बोला, असा आक्रमक पवित्रा पवार यांच्या कार्यकर्त्याने घेतला. यामुळे मुंडे भडकल्या आणि त्यांनी चक्क कार्यकर्त्यांनाच 'बिंडोक' म्हणत आपल्या नेत्याचे वाटोळे करू नका, असे सुनावले. यासर्व प्रकारामुळे कार्यकर्ते भडकले आणि ते पवार यांच्या नावाने घोषणा देऊ लागले.

काही दिवसांवरच बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत गेवराईमध्ये मुंडे आणि पवार यांच्यातील संघर्ष जाहीरपणे पाहायला मिळाला. यापूर्वीही अनेक वेळा पवार-मुंडे यांचे जाहीरपणे खटके उडाले आहेत. आता भाजप आणि शिवसेनेची युती आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघात पवारांप्रमाणे माजी मंत्री बदामराव पंडित देखील मुंडे यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे विधानसभेची जागा भाजप की शिवसेना, अशी परिस्थिती असल्याचे चित्र विधानसभा मतदारसंघात निर्माण झाले आहे.

Intro:खालील बातमीतील पालक मंत्री पंकजा मुंडे यांच्या भाषणाचा व्हिडिओ डेस्कच्या व्हाट्सअप नंबर वर सेंड केला आहे....
*************

आ. पवार समर्थकांनी रोखले मंत्री पंकजा मुंडे यांचे भाषण; अगोदर उमेदवारीचा शब्द द्या; कार्यकर्ते आक्रमक

बीड- मागील वर्षभरापासून मंत्री पंकजा मुंडे व गेवराई विधानसभा मतदारसंघातील आमदार लक्ष्मण पवार यांच्यातील राजकीय दुरावा वाढत आहे. शनिवारी गेवराई येथे पंकजा मुंडे जाहीर सभेमध्ये भाषण करत असताना आ. लक्ष्मण पवार यांच्या समर्थकांनी मंत्री पंकजा मुंडे यांचे भाषण मध्येच रोखले अगोदर आ. लक्ष्मण पवार यांच्या गेवराई विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा शब्द द्या, नंतर पुढे बोला असा आक्रमक पवित्रा आ. लक्ष्मण पवार यांच्या कार्यकर्त्याने घेतल्याने मंत्री पंकजा मुंडे यांची भर सभेत गोची झाली.

Body:धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लोकार्पण सोहळा निमित्त शनिवारी गेवराई येथे कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे लोकार्पण होणार होते मात्र अचानक गडकरी व देवेंद्र फडणवीस यांचा बीड जिल्हा दौरा रद्द झाला. यानंतर मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग लोकार्पण सोहळा पार पडला याप्रसंगी आमदार लक्ष्मण पवार यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना यांचे भाषण सुरू असतानाच मंत्री मुंडे यांना मध्ये अगोदर आमदार लक्ष्मण पवार यांच्या गेवराई विधानसभा मतदारसंघात उमेदवारीचा शहीर भाषणातून शब्द द्या नंतर बाकीचे बोला असा आक्रमक पवित्रा आमदार पवार यांच्या कार्यकर्त्याने घेतल्याने मंत्री पंकजा मुंडे यांची गोची झाली. भडकलेला मंत्री पंकजा मुंडे यांनी चक्क कार्यकर्त्यांनाच बिन्डोक म्हणत आपल्या नेत्याचे वाटोळे करू नका असे म्हणल्यामुळे कार्यकर्ते भडकले व आमदार लक्ष्मण पवार यांच्या नावाने घोषणा करू लागले.

Conclusion:काही दिवसांवरच बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत गेवराई मध्ये मंत्री पंकजा मुंडे व आ. लक्ष्मण पवार यांच्यातील संघर्ष जाहीरपणे पाहायला मिळाला. यापूर्वी अनेक वेळा पवार मुंडे यांचे जाहीर पणे खटके उडाले आहेत याची मतदारसंघात मोठी चर्चा देखील झालेले आहे. आता भाजप व शिवसेनेची युती आहे गेवराई विधानसभा मतदारसंघात पवारांप्रमाणे माजी मंत्री बदामराव पंडित देखील पंकजा मुंडे यांच्या जवळचे आहेत त्यामुळे गेवराई विधानसभेची जागा भाजप की शिवसेना अशी परिस्थिती असल्याचे चित्र गेवराई विधानसभा मतदारसंघात आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.