बीड Maratha Reservation Protest : बीड जिल्ह्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण मिळालंय. यामुळं संचारबंदी लागू केल्यानंतर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी बीडमध्ये इंटरनेट सेवा बंदचे आदेश काढले आहेत. याबाबात दुरसंचार कंपन्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. यामुळं सोमवारी रात्री आठ वाजेपासून इंटरनेट सेवा बंद झालीय. जिल्ह्यात तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. सोमवारी दिवसभरात अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आलीय. या घटनांचे किंवा इतर व्हिडिओ मोबाईलवरुन व्हयरल होऊ शकतात. त्यामुळं जिल्हाधिकाऱ्यांनी इंटरनेट बंदचा आदेश काढलाय. 1 नोव्हंबरच्या मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.
-
#WATCH | SP Beed Nand Kumar Thakur says, "More than 40 people have been arrested till now. The situation is under control right now with no incident reported since last evening. Police patrolling underway at various locations, Sec-144 imposed." pic.twitter.com/iYJy8LMcL9
— ANI (@ANI) October 31, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | SP Beed Nand Kumar Thakur says, "More than 40 people have been arrested till now. The situation is under control right now with no incident reported since last evening. Police patrolling underway at various locations, Sec-144 imposed." pic.twitter.com/iYJy8LMcL9
— ANI (@ANI) October 31, 2023#WATCH | SP Beed Nand Kumar Thakur says, "More than 40 people have been arrested till now. The situation is under control right now with no incident reported since last evening. Police patrolling underway at various locations, Sec-144 imposed." pic.twitter.com/iYJy8LMcL9
— ANI (@ANI) October 31, 2023
49 जणांना अटक : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळं बीड जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 49 जणांना अटक करण्यात आलीय. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलंय.
सोमवारपासून संचारबंदी लागू : बीड शहरात सोमवारी दिवसभरात घडलेल्या आंदोलन आणि विघातक घटनांमुळं जिल्ह्यात सोमवारपासून अनिश्चित काळापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलीय. बीड शहर तसंच तालुका मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या परिसरामध्ये संचारबंदी आदेश म्हणजे बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशानं लागू झाले आहेत. बीडमध्ये सार्वजनिक आणि खासगी मालमत्तेचं मोठं नुकसान होत असल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्यांनी आपल्या आदेशात म्हटलंय.
आमदारांची घरं, राष्ट्रवादी भवन पेटवलं : बीड शहरात संतप्त जमावानं सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर हे राहत असलेल्या बंगल्याला आग लावली होती. मराठा आंदोलकांच्या जमावानं क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात असलेल्या केएसके कॉलेजच्या संस्था कार्यालयालाही आग लावल्याची चर्चा आहे. तसंच आंदोलकांनी बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यालय 'राष्ट्रवादी भवन'ही पेटवून दिल्याची घटना समोर आलीय. यासोबतच मराठा आंदोलकांनी राजकीय पक्षांशी संबंधित हॉटेल, संस्थांचे कार्यालयात जाळपोळ केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके यांच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक करुन जाळपोळ करण्यात आल्याची घटना समोर आली होती. यानंतर जमावानं थेट माजलगाव नगर परिषदेच्या कार्यालयालाच आग लावल्याची घटना घडलीय.
हेही वाचा :
- Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट; राजकीय हालचालींना वेग, काय शिजतंय?
- Maratha reservation Live Updates Today: मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं बीडमध्ये संचारबंदी लागू, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस
- Maratha Reservation : कराड शहरात भगवे वादळ; जरांगे-पाटलांच्या समर्थनार्थ मराठा बांधवांचा विराट मोर्चा, पाहा व्हिडिओ