ETV Bharat / state

लॉकडाऊन असतानाही चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक; तहसीलदारांची 6 ट्रॅक्टरवर कारवाई

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योगधंदे व वाहतूक बंद आहे, अशा बिकट परिस्थितीत देखील वाळूमाफिया अवैध पद्धतीने वाळू वाहतूक करत आहेत. बीड जिल्ह्यात वाळू पट्टे असलेल्या परिसरात सर्रास वाळू वाहतूक केली जात आहे.

magistrate take action transport of illegal sand
लॉकडाऊन असतानाही चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक; तहसीलदारांची 6 ट्रॅक्टरवर कारवाई
author img

By

Published : May 6, 2020, 2:48 PM IST

बीड- लॉकडाऊन असतानादेखील वाळू माफिया अनाधिकृतपणे वाळू वाहतूक करत आहेत. बीड मधील परळी येथे चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक करणाऱ्या सहा ट्रॅक्टरवर तहसीलदारांनी कारवाई केली आहे.परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वाळू वाहतूक प्रकरणाची माहिती मिळताच बुधवारी परळी येथील तहसीलदार डॉ. विपिन पाटील यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सहा ट्रॅक्टरवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पकडलेली वाळू तेलसमुख येथील गंगेच्या पात्रातून आणली होती.

असा रचला सापळा

वाळू चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यावरून तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी वाळू चोरी पकडण्यासाठी सापळा रचला. रात्री उशिरा त्यांनी बोरखेड कॅनॉलवर मुक्काम ठोकला. रात्री 2 वाजल्यापासून वाळुचे ट्रॅक्टर येण्यास सुरुवात झाली. एक एक करत तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी सकाळपर्यंत तब्बल सहा ट्रॅक्टर पकडले. या ट्रॅक्टरमध्ये लाखो रुपयांची वाळू असून सर्व जप्त करून ते सिरसाळा पोलीस ठाण्यात आणले आहेत. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांच्यासोबत नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, तलाठी युवराज सोळंके, कोतवाल खाजा आदी उपस्थित होते. दरम्यान वाळू माफीयांवर मोठी कारवाई झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून परिसरात खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.