गेवराई (बीड) - जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात अचानकपणे झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे तत्काळ पंचनामे करावे, अशी मागणी आमदार लक्ष्मणराव पवार यांनी तहसीलदार सचिन खाडे यांना दिलेल्या पञात केली आहे.
गेवराई परिसरात काल बुधवारी रात्री अचानकपणे अवकाळी पाऊस व गारपिट झाली. गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांर मोठे आर्थिक संकट ओढले आहे. यासंदर्भात आमदार लक्ष्मणराव पवार यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन पंचनामे करण्याची मागणी केली. निवेदनात कृषी आधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी बैठक घेऊन अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश तत्काळ देण्याची मागणी केली आहे.