ETV Bharat / state

बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीनेच नदीपात्रातच थाटले जाताहेत बाजार ओटे; मुख्याधिकाऱ्यांचा खुलासा - बीड

शिरूर कासार येथील सिंधफणा नदीतील बाजार ओटे बांधण्याचे काम थांबवले न थांबवल्यास येत्या पावसाळ्यात पूर परिस्थितीचा जबरदस्त तडाखा शहराला बसू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांमुळेच अनधिकृत बांधकामावर ७१ लाख रुपयांचा खर्च केला जात असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष रोहिदास गाडेकर यांनी केला आहे.

बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीनेच नदीपात्रातच थाटले जाताहेत बाजार ओटे
author img

By

Published : May 4, 2019, 3:30 AM IST

Updated : May 4, 2019, 7:10 AM IST

बीड - पालकमंत्री पंकजा मुंडे नदी खोलीकरण व रुंदीकरण तसेच जलसंधारण मोहीम जलदगतीने राबवत आहेत. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडे आणि भाजपच्या ताब्यात असलेली शिरूर कासार येथील नगरपंचायत चक्क नदीपात्रातच प्रवाह अडवून बाजार ओटे बांधून प्रवाह रोखत आहेत.

सिंधफणा नदीत बाजार ओटे बांधण्याची परवानगी दस्तुरखुद्द तत्कालीन बीड जिल्हाधिकारी यांनीच दिली असल्याचा खुलासा शिरूर कासार नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे. सिंधफणा नदी पात्रातील बाजाराचे ७१ लाख रुपयांचे अनाधिकृत काम थांबवून सिंधफणा नदी वाचवावी, अशी मागणी गटनेते तथा नगरसेवक शेख नसीर शेखलाला यांनी केली आहे.

मुख्याधिकारी नीलिमा कांबळे

काय आहे प्रकरण-

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या तालुक्याच्या शहराच्या बाजूने सिंधफणा नदी गेलेली आहे. या नदीचा प्रवाह मोठा असतो. यापूर्वी सिंधफणा नदीकाठच्या गावांना पूर परिस्थितीचा तडाखा बसलेला आहे. असे असूनही या नदीपात्रातच बाजार ओटे बांधण्याची परवानगी तत्कालीन बीड जिल्हाधिकारी यांनी दिल्याचा खुलासा शिरूर कासार येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी नीलिमा कांबळे यांनी केला आहे. या प्रकरणात आम्ही अधिक खोलात गेलो असता असे लक्षात आले की, सिंधफणा नदीच्या प्रवाह मार्गावर बाजार ओटे बांधण्याबाबतचा ठराव गतवर्षी शिरूर कासार नगर पंचायतीतील सदस्यांनी घेतला होता. आज जे सदस्य बाजार ओटे बांधण्यासाठी विरोध करत आहे. ते देखील ठराव घेताना एकाच गटात होते. मात्र, आता शिरूर कासार येथील राजकीय समीकरणे बदलली असल्याने अनधिकृत जागेवर बाजार ओटे बांधले जात असल्याचा भांडाफोड झाला. विशेष म्हणजे या प्रकरणात तत्कालीन बीड जिल्हाधिकारी यांची बाजार ओटे बांधण्यासाठी परवानगी असल्याचा खुलासा नीलिमा कांबळे यांनी केला. मी मार्चनंतर शिरूर नगरपंचायतीचा पदभार स्वीकारला आहे. त्यामुळे सिंधफणा नदीच्या प्रवाहात बाजार ओटे बांधण्याच्या कामाला कशी परवानगी मिळाली, हे मी सांगू शकत नाही. असेही कांबळे म्हणाल्या.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष-

शिरूर कासार येथील नागरिकांनी सिंधफणा बाजार तळावरील ओटे अनाधिकृत असून ते काम थांबवण्याची मागणी बीड जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांच्याकडे केली आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयावर या नदीपात्राचे भवितव्य अवलंबून आहे.

शिरूर कासार येथील सिंधफणा नदीतील बाजार ओटे बांधण्याचे काम थांबवले न थांबवल्यास येत्या पावसाळ्यात पूर परिस्थितीचा जबरदस्त तडाखा शहराला बसू शकतो, असे निवेदनात म्हटले आहे. प्रशासनातील काही अधिकाऱ्यांमुळेच अनधिकृत बांधकामावर ७१ लाख रुपयांचा खर्च केला जात असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष रोहिदास गाडेकर यांनी केला आहे.

नदीपात्रातील त्या अनाधिकृत बाजारपेठेबाबत आम्ही वेळोवेळी शिरूर नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली. मात्र, तरी याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब झिरपे यांनी केला आहे.

Last Updated : May 4, 2019, 7:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.