ETV Bharat / state

छावण्या सुरु करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या संमतीची गरज नाही - उच्च न्यायालय

उच्च न्यायालयाने मंगळवारी सरकारवर ताशेरे ओढले. छावण्या सुरु करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या संमतीची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करत शासन निर्णयातील पालकमंत्र्यांची संमती आवश्यक असणारी अट औरंगाबाद खंडपीठाने स्थगित केली आहे.

author img

By

Published : Mar 12, 2019, 10:25 PM IST

Beed

बीड - उच्च न्यायालयाने मंगळवारी सरकारवर ताशेरे ओढले. छावण्या सुरु करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या संमतीची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करत शासन निर्णयातील पालकमंत्र्यांची संमती आवश्यक असणारी अट औरंगाबाद खंडपीठाने स्थगित केली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मेहबूब शेख यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती.

बीड जिल्ह्यातील चारा छावण्या मंजुरीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनाच झुकते माप मिळाले होते. आता न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा गोष्टींना ब्रेक लागला आहे. न्यायाधीश वराळे आणि न्यायाधीश तांबडे यांच्या पीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.

बीड जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात दुष्काळ असताना देखील राज्य सरकारची भूमिका अस्पष्ट होती. दुष्काळ जाहीर करून महिने उलटले तरी देखील कुठल्याच उपाययोजना राबवल्या नाहीत. यामध्येच चारा छावणी मंजुरीसाठी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची संमती असणे आवश्यक असल्याचा नवा नियम या सरकारने लागू केला. या विरोधात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

छावण्या सुरु करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या संमतीची गरज नाही

मेहबूब शेख यांच्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले, की आजपर्यंत कधी पालकमंत्र्यांची संमती घेण्याची पद्धत नव्हती. सरकारने म्हणणे सादर करण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली यावर पालकमंत्र्यांच्या संमतीची अट स्थगित करत न्यायालयाने सरकारला आपले म्हणणे मांडण्यासाठी ४ आठवड्यांचा वेळ दिला आहे. तसेच दुष्काळी उपाययोजनामध्ये जाचक अटी ठेवू नका. २०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे कामे करा, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

Intro:दुष्काळात राजकारण करणाऱ्या सरकारला न्यायालयाची चपराक

बीड- जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे अशा दुष्काळात सरकारने राजकारण केल्याने मंगळवारी उच्च न्यायालयाने सरकारवर ताशेरे ओढले आहेत. छावण्या सुरु करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या स्तगिती ची गरज काय? असा प्रश्न उपस्थित करत शासन निर्णयातील पालकमंत्र्यांची संमती आवश्यक करणारी अट मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगित केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयावरून सरकारची नाचक्की झाली. असल्याचा प्रत्यय आला. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मेहबूब शेख यांनी या सरकारच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. बीड जिल्ह्यातील चारा छावण्या मंजुरी मध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनाच झुकते माप मिळाले होते. या बाबीला न्यायालयाच्या निर्णयामुळे ब्रेक लागला आहे. न्या. वराळे आणि न्या. तांबडे यांच्या पीठासमोर या प्रकरणाची मंगळवारी सुनावणी झाली.

Body:बीड जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात दुष्काळ असताना देखील राज्य सरकारची भूमिका अस्पष्ट होती. दुष्काळ जाहीर करून महिनोन् महिने उलटले तरी देखील कुठलाच उपाययोजना राबवल्या नाहीत. यातच चारा छावणी मंजुरीसाठी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची संमती असणे आवश्यक असल्याचा नवा नियम या सरकारने लागू केला. या विरोधात बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी न्यायालयात धाव घेतली मेहबूब शेख यांच्या याचिकेवर निर्णय देताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठा ने म्हटले आहे की, आजपर्यंत कधी तशी पालकमंत्र्यांची संमती घेण्याची पद्धत नव्हती. असे म्हणत सरकारला न्यायालयाने फटकारले आहे. सरकारने म्हणणे सादर करण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली यावर पालकमंत्र्यांच्या संमतीची अट स्थगित करत न्यायालयाने सरकारला आपले म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ दिला तसेच दुष्काळी उपाययोजना मध्ये जाचक अटी ठेवू नका 2015 च्या शासन निर्णयाप्रमाणे कामे करा असे निर्देश देखील न्यायालयाने दिले आहेत.

Conclusion:उच्च न्यायालयाचा हा निर्णय सरकारचे सरकारची नाचक्की करणारा असून या प्रकरणात सरकार तोंडघशी पडले आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने गिरीश थीगळे यांनी काम पाहिले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना मोठा दणका बसला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच हा दणका बसला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.