बीड : बीड जिल्ह्यात अनेक दिवसापासून अवैद्य धंद्यांचा महापूर आला की काय असेच म्हटले तर वावग ठरणार नाही. आष्टी तालुक्यात दोन दिवसापूर्वीच एक दोन नव्हे तर तब्बल 70 किलो गांजा उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर ( Sub Divisional Police Officer Abhijeet Dharashivkar ) यांनी बालेवाडी शिवारात छापा ( Raid in Balewadi Shivara ) मारून पकडला होता. त्यानंतर दोन दिवस उलटतात, तोच पुन्हा एकदा गेवराई तालुक्यातील कोळगाव या गावांमध्ये चक्क दारू बनवण्यासाठी स्पिरिट्सचा टँकर ( Tanker of spirits for brewing ) राज्य उत्पादन शुल्क यांनी पकडले. मात्र जिल्ह्यात या अवैध धंद्याचा महापूर आहे की काय ? अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये बोलली जात आहे. आष्टी तालुक्यात चक्क एका शेतकऱ्यांना कोंबडी पालनाच्या शेडमध्येच गांजा लपवील्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
कुक्कुटपालनच्या शेडवर छापा : आष्टी तालुक्यातील भवरवाडी गावालगत असलेल्या एका कुक्कुटपालनच्या शेडमध्ये गांजा ठेवल्याची माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस निरीक्षक चाऊस आणि आष्टीचे पथक भवरवाडी शिवारात एका कुक्कुटपालनच्या शेडवर छापा मारला त्यावेळी पोलिसांना शेडच्या एका कोपऱ्यात ताडपत्री खाली गोण्यामधील लपवलेला गांजा अंदाजे 5 लाख 91 हजार 750 रुपयेचा 59 किलो गांजा सापडला आहे. तो गांजा पोलिसांनी जप्त केला असुन शेतमालक हौसराव उर्फ पप्पू साहेबराव पवार रा. कडा ता. आष्टी यांला ताब्यात घेतले आहे, याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांच्या फिर्यादीवरून हौसराव पवार यांनी यांच्यावर एनडीपीएस कायद्याने आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अवैध धंद्याच्या घटना उघडकीस : बीड जिल्ह्यात दररोज अवैध धंद्याच्या घटना उघडकीस येत आहेत. याच्यावर पोलीसही मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहेत. परंतु सध्या जिल्ह्यामध्ये 704 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे त्यामुळे या घटना उघडकीस येत आहेत का ? आणि येणाऱ्या काळात अशा घटना घडू नये याच्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हानच म्हणावे लागेल.