बीड : Ganesh Chaturthi २०२३ : भारतातील 21 गणपतीपैकी एक असलेला आशापूरक गणपती (Ashapurkar Ganesh) बीडपासून अगदी दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या नामलगाव या ठिकाणी आहे. जिल्ह्यात भालचंद्र गणेश, राजुरी येथे नवगण, गंगामसला येथे मोरेश्वर, श्रीक्षेत्र राक्षस भवन येथे विज्ञानेश्वर अशी विविध गणपती मंदिरे बीड (Ganesh Temple In Beed) जिल्ह्यात आहेत.
काय आहे आख्यायिका : सर्वांना पावणारा गणेश अशी या गणपतीची प्रसिद्धी असल्यामुळे या गणपतीला आशापूरक गणपती (Beed Ganesh Chaturthi festival) असे म्हणतात. ब्रह्म, विष्णू, महेश, सूर्य, शक्ती, या सर्वांच्या इच्छा या गणपतीने पूर्ण केलेल्या आहेत, अशी आख्यायिका आहे. पंचदेव या गणपतीची उपासना करतात. यमधर्म संस्थापित, आशापूरक यमराजाला महादुःख झाले होते. त्या काळामध्ये यमराज या ठिकाणी आल्यानंतर स्वयंभू मोरया या ठिकाणी प्रगट झाले. यमराजाची इच्छा पूर्ण झाली. त्या महादुःखातून यमराजाला मुक्ती मिळाली त्यामुळे या गणपतीला आशापूरक असे म्हणतात. (Ganesh Chaturthi)
सुबुद्धी तीर्थामध्ये हेमा राजाने स्नान केलं : प्रत्येक गणेश चतुर्थीला (Ganesh Chaturthi) या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्तगण दर्शनासाठी येतात. या ठिकाणी भाविकांची इच्छा पूर्ण होते. आशापूरक गणपती हा कृतयुगातील आहे. या ठिकाणी त्रिवेणी संगम आहे. बिंदुसरा, करपरा, नारदा या तीन नद्यांचा संगम आहे. या ठिकाणी सुबुद्धी नावाचं तीर्थ आहे. सुबुद्धी तीर्थामध्ये हेमा राजाने स्नान केलं आणि त्या ठिकाणी यम राजाचे दुःख, रोग निघून गेले. यमराज अंघोळ करून पुढे आल्यानंतर हा श्री गणेश मोरया महाराजांना प्रसन्न झाला. तेव्हापासून यम धर्म संस्थापित आशापूरक गणपती असं नाव प्रचलित झालं आहे.
भाविकांची इच्छा होते पूर्ण : आशापूरक गणपती अत्यंत पुरातन काळातील आहे. अनेक भाविक या गणपतीच्या दर्शनासाठी येतात. या ठिकाणी आल्यानंतर भाविकांची इच्छा गणपती पूर्ण होते, असे मानण्यात याते. भक्त अंजना भोई सांगतात की, त्यांची देखील इच्छा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे त्या दर्शनासाठी येत असतात.
अत्यंत पुरातन दगडी बांधकामातील मंदिर : भक्त आदित्य भोई यांनी सांगितलं की, मनातल्या इच्छा या ठिकाणी आल्यावर पूर्ण होतात. त्यांची देखील इच्छा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. अत्यंत पुरातन दगडी बांधकामातील सुशोभीकरण केलेलं गणपती मंदिर आहे. दररोज अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. उत्सव काळात भाविकांची अलोट गर्दी असते, अशी माहिती आदित्य भोई यांनी दिली.
हेही वाचा -