बीड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन झाला आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा स्थितीत हाताला काम नसलेल्या व भूमिहीन असलेल्या गोरगरीब नागरिकांना मोफत किराणा साहित्य देण्याचा उपक्रम बीडमध्ये राबविला आहे. येथील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र, सी आय आय फाउंडेशन दिल्ली, गुंज संस्था, इंडिया बॉल फाउंडेशन, इन्फोसेस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील 5 हजार कुटुंबीयांना मोफत किराणा साहित्य वाटप करण्यात आले आहे. कोरोना विषाणूमुळे कराव्या लागणाऱ्या प्रतिबंधक उपाययोजनांमुळे संपूर्ण देशभर लॉकडाऊन आहे. अशा बिकट परिस्थितीत गोरगरिबांचे हाल होऊ नयेत, यासाठी 'नवचेतना' सामाजिक संस्था समोर आल्याचे संस्थेच्या प्रमुख मनीषा घुले यांनी सांगितले.
लहान मुलांसाठी गूंज संस्था व इंडिया बॉल संस्थेच्यावतीने पोस्टीक आहार देखील वाटप करण्यात येत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते ओमप्रकाश गिरी यांनी यावेळी सांगितले.