ETV Bharat / state

Beed Crime : केजच्या नायब तहसीलदारांवर जीवघेणा हल्ला; भररस्त्यात पेटविण्याचा प्रयत्न - Fatal attack on Naib Tehsildar of Kaij

केजच्या नायब तहसीलदार आशा वाघ यांच्यावर आज दुपारी जीवघेणा हल्ला झाला. त्यांच्या अंगावर अज्ञात व्यक्तीने अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. या हल्ल्यातून त्या थोडक्यात वाचल्या आहेत. त्यांच्यावर केज उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. या घटनेने बीड जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

Beed Crime
आशा वाघ, नायब तहसीलदार
author img

By

Published : Jan 20, 2023, 8:39 PM IST

बीड: आशा वाघ या संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार पदावर काम करत आहेत. आज दुपारी चारच्या दरम्यान त्या जेवणासाठी घराकडे निघाल्या होत्या. रस्त्याच चौघांनी त्यांचा रस्ता अडवून त्यांच्यावर हल्ला चढविला. यापैकी एका महिलेने बाटली मधील पेट्रोल टाकून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. परंतु वाघ यांनी महिलेच्या हाताला झटका देऊन पळ काढला. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय केज येथे उपचार सुरू आहेत.

काय आहे प्रकरण : आज दि. २० जानेवारी रोजी दुपारी २:३० च्या सुमारास केज तहसीलच्या संजय गांधी विभागाच्या नायब तहसीलदार आशा वाघ-गायकवाड या बीड रोडवरील बीएसएनएल टॉवरच्या मागील भागातील त्यांच्या घरी दुपारचे जेवण करून तहसील कार्यालयाकडे येत होत्या. या दरम्यान चारचाकी गाडीतून आलेल्या त्यांच्या भावाची बायको सुरेखा मधुकर वाघ, तिचा भाऊ हरिदार भास्कर महाले, आई मुंजाबाई भास्कर महाले आणि एक अनोळखी महिला व वाहन चालक यांनी त्यांना रस्त्यात अडविले. यानंतर जळगाव जिल्ह्यातील दोनडिगर येथील जमिनीच्या हक्कसोड पत्रावर सही करण्यासाठी जबरदस्ती केली. तसेच तुझ्यामुळे मधुकर वाघ हा जेलमध्ये असल्याने त्याची सुटका करण्यासाठी पोलीस केस मागे घे असे म्हणून त्यांच्यात बाचाबाची झाली. त्या महिलांनी आशा वाघ यांच्या गळ्यात दोरीचा फास टाकून गळा आवळला. हरिदास मुंजाबा महालेने तिच्या अंगावर पेट्रोल सदृश्य ज्वलनशील पदार्थ टाकला आणि त्यांना पेटवून देण्यासाठी लायटर काढले. आशा वाघ यांनी आरडा ओरड करून बीड रोडवरील एका हॉटेलच्या दिशेने पळ काढला. यानंतर लोक जमा होताच हल्लेखोर चाकी गाडीतून पळून गेले. आशा वाघ-गायकवाड यांच्या गळ्यावर हल्ल्याच्या खुना स्पष्ट दिसत आहेत.

यापूर्वीही वाघ यांच्यावर हल्ला : या पूर्वी दि. ६ जून २०२२ केज तहसील कार्यालयात त्यांचा सख्खा भाऊ मधुकर वाघ याने नायब तहसीलदार आशा यांच्यावर धारदार कोयत्याने खुनी हल्ला केला होता. आशा वाघ यांच्या मानेवर व डोक्यावर वार करण्यात आल्याने त्या जखमी झाल्या होत्या. त्या प्रकरणी मधुकर वाघ आणि अन्य एकावर केज पोलीस ठाण्यात दि. ७ जून रोजी गु. र. नं. २२२/२०२२ नुसार भा. दं. वि. ३५३, ३०७, ३३३ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या प्रकरणी मधुकर वाघ हा कारावासात असून त्याची अंडर ट्रायल सुनावणी सुरू आहे.

निवडणुकीच्या वादातून प्राणघातक हल्ला : राज्यात डिसेंबर, 2021 मध्ये ग्रामपंचायत निवडणुकींचे मतदान पार पडले होते. दरम्यान निवडणुकींच्या निकालावरून वेगवेगळ्या घटना समोर आल्या होत्या. बीड जिल्ह्यातून सरपंचावर ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना 2021 ला डिसेंबर महिन्यात घडली होती.

सरपंचावर प्राणघातक हल्ला : बीडच्या माळापुरी येथे नवनिर्वाचित सरपंचावर विरोधी गटाने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात सरपंचासह अन्य एक जण गंभीर जखमी झाला होता. अशोक ढास असे जखमी असलेल्या नवनिर्वाचित सरपंचांचे नाव होते. त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. दरम्यान, ग्रामस्थ बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता तक्रार दाखल न करून घेतल्याने, संतप्त ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

हेही वाचा : Minor Girl Set Fire: टवाळखोरांना लग्नात नृत्य करण्यास मज्जाव, नराधमांनी पेट्रोल टाकून बालिकेला पेटवले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.