बीड: पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाळवंडी गावामध्ये एका शेतकरी कुटुंबाने घरातच आपले जीवन संपवले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आहे. बाबासाहेब रावसाहेब म्हेत्रे (40 वर्षे) आणि कुशीवर्ता बाबासाहेब म्हेत्रे (35 वर्षे) असे मयत पती-पत्नीचे नावे आहेत. ते शेतात राबून आपली उपजीविका भागवत होते. आज सकाळी दोघांचेही मृतदेह संशयास्पद अवस्थेत घरातच आढळून आले. ही घटना गावात समजताच घरासमोर मोठी गर्दी झाली.
पोलीस घटनास्थळी दाखल : पोलिसांना माहिती कळताच पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीआय भारती यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत; मात्र हा काय प्रकार आहे? याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे.
गोठ्यात झोपलेल्या व्यक्तीचा खून : या अगोदरही पाटोदा तालुक्यातील वैद्यकींनी या गावामध्ये शेतातील गोठ्यामध्ये झोपलेल्या एका व्यक्तीचा खून केला होता. या निष्पाप लोकांचे बळी का घेतले जात आहेत, हा प्रश्न अनुत्तरित आहे. विशेष म्हणजे, गावातील क्षुल्लक कारणावरून अशा घटना घडत असल्याच्या चर्चासुद्धा गावात सुरू आहेत. पोलीस प्रशासन या घटनांचा बारकाईने तपास करत आहे.
आर्थिक तंगीला कंटाळून आत्महत्या: आर्थिक तंगीला कंटाळून पती-पत्नीने गोरखपूर जिल्ह्यात जंगलात विष प्राशन करून डिसेंबर, 2022 मध्ये आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी टीनशेड घरात त्यांचे मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तपास करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
भाड्याच्या खोलीत राहायचे: मिळालेल्या माहितीनुसार, महाराजगंजच्या सिंदुरिया येथे राहणारे ३० वर्षीय विवेकानंद दुबे हे त्यांच्या २५ वर्षीय पत्नीसोबत भट्टा कॉलनी, जंगल धुसद येथे संजय निषाद यांच्या टीनशेडमध्ये राहत होते. संजयने सांगितले की, 25 नोव्हेंबर 2022 रोजी दोघांनी पती-पत्नी म्हणून भाड्याने खोली घेतली होती. भाड्याची रक्कम 1500 रुपये रोख आणि आधार कार्ड एक आठवड्यानंतर देऊ असे सांगितले होते, ते अद्याप मिळालेले नाही. विवेकानंद ऑटो चालवत असत.