ETV Bharat / state

बनावट स्वाक्षरी प्रकरणी संगीता ठोंबरेंना दिलासा नाही; गुन्हा कायम राहणार

बनावट स्वाक्षर्‍या करून लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदावर आपली नेमणूक केल्याच्या कथित संचालक गणपती कांबळे यांच्या तक्रारीवरून माजी आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीसह इतर गुन्हे नोंद करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश केजच्या न्यायालयाने दिले होते.

बनावट स्वाक्षरी प्रकरणी संगीता ठोंबरेंना दिलासा नाही

author img

By

Published : Mar 3, 2020, 9:44 PM IST

बीड - लोकनेते गोपीनाथ मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीशी संबंधीत प्रकरणात दाखल झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात स्थगिती देण्यास अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने माजी आमदार संगीता ठोंबरे यांना नकार दिला आहे. यामुळे त्यांच्यावरचा गुन्हा कायम राहणार आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर ठोंबरे यांच्या अडचणीत भर पडली आहे.

केज न्यायालयाच्या आदेशाने ठोंबरे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल झाला होता. बनावट स्वाक्षर्‍या करून लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या संचालक पदावर आपली नेमणूक केल्याच्या कथित संचालक गणपती कांबळे यांच्या तक्रारीवरून माजी आमदार संगीता ठोंबरे व त्यांचे पती डॉ. विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीसह इतर गुन्हे नोंद करून चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश केजच्या न्यायालयाने दिले होते.

हेही वाचा - आधारमुळं खरंच मिळाला 'आधार'; ४ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा सापडला

संगीता ठोंबरे या तालुक्यातील लहुरी येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीच्या मुख्य प्रवर्तक आहेत. तर, त्यांचे पती डॉ.विजयप्रकाश ठोंबरे या सूतगिरणीचे अध्यक्ष आहेत. कथीत संचालक गणपती सोनाप्पा कांबळे यांच्या बनावट स्वाक्षर्‍या करून संचालक पदावर नियुक्ती केल्याची त्यांची तक्रार आहे. या व्यवहारात श्रीमती ठोंबरे व पती विजयप्रकाश ठोंबरे यांनी आपल्या खोट्या स्वाक्षर्‍या करून शासनाची व जनतेची फसवणूक करून आपणास नाहक गोवण्याचा प्रयत्न केला. सदर आर्थिक व्यवहारात आपला काही एक संबंध नसून पुराव्यादाखल त्यांनी आपल्या खोट्या सह्या केल्याचा फॉरेन्सिक तज्ज्ञ अश्विनी पवार यांचा अहवाल आणि शपथपत्र जोडून तक्रार दिली होती. यावरून केजच्या प्रथमवर्ग न्यायालयाने संगीता ठोंबरे व विजयप्रकाश ठोंबरे यांच्याविरोधात फसवणुकीसह इतर कलमांन्वये गुन्हा नोंद करून चौकशी करावी आणि अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा - बीडमध्ये अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान; शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न

दरम्यान, या आदेशाच्या विरोधात ठोंबरे यांनी अंबाजोगाई येथील जिल्हा सत्र न्यायालयात स्थगिती मागितली होती. या प्रकरणात अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. एस. सापतनेकर यांनी केज न्यायालयाचा आदेश कायम ठेवला. या प्रकरणात गणपती कांबळे यांच्या वतीने अंबाजोगाई न्यायालयात प्रवीण मेटे यांनी काम पाहिले. न्यायालयाच्या या निकालानंतर माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या अडचणीत भर पडली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.