ETV Bharat / state

दुष्काळामुळे मोडावे लागले पोरीचे लग्न; बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा - draught

अनेक शेतकरी दुष्काळामुळे लग्नाला आलेल्या पोरींची लग्न जुळवू शकत नाहीत. बीड जिल्ह्यातली ही शोकांतिका.ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा.

beed farmer
author img

By

Published : May 11, 2019, 5:19 AM IST

बीड- सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाने आमच्या चेहऱ्यावरचं हसू हिरावून घेतलंय. घरची पाच एकर जमीन असूनही मोलमजुरी करून जगावं लागतंय. मागील दोन वर्षांपासून शेतीतून एक नवा पैसा देखील उत्पन्न मिळाले नाही. एवढेच काय तर दीड- दोन वर्षांपूर्वी मुलीचं लग्न जमलं होतं, मात्र खिशात पैसा नव्हता म्हणून काळजावर दगड ठेवून पोरीचं लग्न मोडावं लागलं. पोरींचं शिक्षण देखील बंद आहे. या दुष्काळानं आमचं जगणं अवघड करून टाकलंय. शासनाकडून ना हाताला काम मिळतेय ना रोजगाराची हमी..... ही कैफियत मांडली आहे बीडमधील शेतकरी किसन गंगाराम अहिरे व त्यांच्या पत्नी विजयमाला किसन अहिरे यांनी. किसन अहिरे हे केवळ एक प्रातिनिधिक स्वरूपात आहेत. असे अनेक शेतकरी दुष्काळामुळे लग्नाला आलेल्या पोरींची लग्न जुळवू शकत नाहीत. बीड जिल्ह्यातली ही शोकांतिका. याबाबत ईटीव्ही भारतने घेतलेला हा आढावा....

beed farmer

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शिंदी गावातील रहिवासी असलेले किसन गंगाराम अहिरे यांच्याकडे पाच एकर शेती आहे. किसन अहिरे यांना सात मुली व आठवा मुलगा आहे. यातील चार मुलींची लग्न झाली आहेत. यातील मोठी मुलगी जयश्री हिला दोन मुलीच झाल्यामुळे व मुलगा होत नसल्याने सासरच्या लोकांनी सोडून दिलेले आहे. त्यामुळे जयश्री व तिच्या दोन मुलींचा सांभाळदेखील वडील किसन आहिरे हेच करत आहेत. चार वर्षापासून शेतात दुष्काळामुळे काहीच पिकत नाही. एका नव्या पैशाचे उत्पन्न पाच एकर शेतीतून मिळत नसल्याने सात मुली, एक मुलगा व पत्नी या सगळ्यांना जगवायचं कसं? असा प्रश्न किसनराव यांच्यासमोर आहे. दीड वर्षापूर्वी किसन आहिरे यांची पाचवी मुलगी सविता हिचा विवाह केज तालुक्यातीलच एका मुलाबरोबर ठरला होता. लग्न ठरले मात्र लग्नासाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुळव होत नसल्याचे लक्षात आल्यावर किसनराव यांनी जड अंत:करणाने सविताचे लग्न मोडून टाकले. बापानेच पोरीचं लग्न पैशाअभावी मोडल्याचं दुःख व शल्य आजही माझ्या मनात सलत असल्याचे सांगताना किसनराव यांचे डोळे पाणवतात. किसन आहिरे यांच्यासारखे अनेक शेतकरी दुष्काळामुळे आपल्या पोरी उजवू शकत नाहीत, ही बीड जिल्ह्यातली वस्तुस्थिती आहे.

आमच्या बचत गटातून केली मदत- लक्ष्मी बोरा

केज तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी किसान अहिरे यांना शासनाची कुठलीच मदत मिळालेली नाही. अशा परिस्थितीत जिजाऊ महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही किसन अहिरे यांना नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र अंतर्गत चालणाऱ्या ज्ञानेश्वरी महिला बचत गटाच्या माध्यमातून शेळ्या घेण्यासाठी आर्थिक मदत केली. शिवाय मुलीच्या लग्नासाठी देखील अहिरे यांना कर्ज दिलेले आहे. त्यांनी ते कर्ज वेळेवर परतफेड केलेले आहे. मात्र आता दुष्काळी परिस्थिती असल्याने कर्ज घेऊन फेडायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्याने मुलीच्या लग्नाचा प्रश्न बिकट बनला आहे. अशी माहिती ज्ञानेश्वरी महिला बचत गटाच्या अध्यक्षा लक्ष्मी बोरा यांनी दिली आहे.

या सगळ्या व्यथा भोगणाऱ्या किसनरावांना मागच्या अनेक वर्षात शासनाच्या घरकुल योजनेद्वारे घरदेखील मिळाले नाही. दहा बाय दहाच्या दोन पत्र्याच्या खोल्या यातच त्यांचं दहा अकरा माणसांचे कुटुंब कसेबसे राहत आहे. किसन अहिरे यांच्या घरात विजेचे कनेक्शन देखील नाही. इथे खायचे वांदे आहेत तर लाईट बिल भरायचे कुठून? त्यामुळे विजेचे कनेक्शन घेतले नसल्याचे अहिरे यांनी सांगितले.

दिपकच्या भवितव्याची चिंता-

किसन आहिरे यांना सात मुलीनंतर आठवा दिपक नावाचा मुलगा आहे. पैशाअभावी मुलींचे शिक्षण तर बंद केले. आता मुलाच्या शैक्षणिक भवितव्याच्या बाबतीत काळजी करताना किसन अहिरे म्हणाले, की आता आमची जिंदगी तर अशीच गेली. पण मुलाच्या शिक्षणाचा काय करावं असा प्रश्न भेडसावतोय. मुलगा आठवीत असून चांगला चित्रकार आहे पण त्याला आमची काहीच मदत होत नसल्याने किसनराव यांनी खंत व्यक्त केली.

मुलीचे लग्न करू न शकणारे अनेक शेतकरी - मनीषा घुले

दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या सचिव मनीषा घुले यांनी शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर बोलताना सांगितले, की सिंधी या गावातील किसन अहिरे हे एक प्रतिनिधिक स्वरूपातील शेतकरी आहेत. बीड जिल्ह्यात किसन आहिरेंसारखे दारिद्र्यात जगणारे व मुलीचे लग्न देखील करू न शकलेले अनेक शेतकरी आहेत. शासनाच्या कुठलाच योजनांचा त्यांना लाभ झालेला नाही. या सगळ्या परिस्थितीशी बीड जिल्ह्यातील पुढाऱ्यांना काही घेणे-देणे नाही. प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे, असे नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या सचिव मनीषा घुले यांनी सांगितले.

Intro:बीड जिल्ह्यातील दुष्काळाचा परिणाम सर्व स्तरातील व्यक्तींना होत आहे याबाबत विशेष स्टोरी पाठवत आहे
*******************
दुष्काळामुळे आम्हाला आमच्या पोरींचे लग्न मोडावे लागले; बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मांडली व्यथा

बीड- सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाने आमचं चेहऱ्यावरचं हसू हिरावून घेतला आहे. घरची पाच एकर जमीन असूनही मोलमजुरी करून जगावं लागतंय. मागच्या दोन वर्षांपासून शेतीतून एक नवा पैसा देखील उत्पन्न मिळाले नाही. एवढेच काय तर दीड- दोन वर्षांपूर्वी मुलीचं लग्न जमलं होतं मात्र खिशात पैसा नव्हता म्हणून पोरीचं लग्न काळजावर दगड ठेवून मोडावे लागले. बापानेच पोटच्या पोरीचा लग्न पैसे नाहीत म्हणून मोडावं याचं दुःख व शल्य आजही माझ्या मनात सलत आहे. पोरींचे शिक्षण देखील बंद आहे. या दुष्काळानं आमचं जगणं अवघड करून टाकलंय, शासनाकडून ना हाताला काम मिळतेय ना रोजगाराची हामी, अशी कैफियत मांडली आहे बीड मधील शेतकरी किसन गंगाराम अहिरे व त्यांच्या पत्नी विजयमाला किसन अहिरे यांनी, किसन अहिरे हे केवळ एक प्रातिनिधिक स्वरूपात आहेत असे आणि शेतकरी दुष्काळामुळे लग्नाला आलेल्या पोरी उजव होऊ शकत नाही ही शोकांतिका बीड जिल्ह्यातली आहे याबाबत ईटीव्ही भारत ने घेतलेला हा आढावा....

Body:बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील शिंदी या गावातील रहिवासी असलेले किसान गंगाराम अहिरे यांच्याकडे पाच एकर शेती आहे. किसन अहिरे यांना सात मुली व आठवा मुलगा आहे. यातील चार मुलींची लग्न झाली आहेत. यातील मोठी मुलगी जयश्री हिला दोन मुलीच झाल्यामुळे व मुलगा होत नसल्याने सासरच्या लोकांनी सोडून दिलेले आहे. त्यामुळे जयश्री हिच्या दोन मुली व जयश्री हिचा सांभाळ देखील वडील किसन आहिरे हेच करत आहेत. चार वर्षापासून शेतात दुष्काळामुळे काहीच पिकत नाही. एका नव्या पैशाचे उत्पन्न त्या पाच एकर शेतीतून मिळत नसल्याने सात मुली, एक मुलगा व पत्नी या सगळ्यांना जगवायचं कसं असा प्रश्न किसनराव यांच्यासमोर आहे. दीड वर्षापूर्वी किसन आहिरे यांची पाचवी मुलगी सविता हिचा विवाह केज तालुक्यातीलच एका मुलाबरोबर ठरला होता. लग्न ठरले मात्र लग्नासाठी लागणाऱ्या पैशाची जुळवाजुळव होत नसल्याचे लक्षात आल्यावर किसनराव यांनी पाचवी मुलगी सविता हिचे लग्न जड अंतकरणाने मोडून टाकले. बापानेच पोरीचं लग्न पैशाअभावी मोडल्याचे दुःख व शल्य आजही माझ्या मनात सलत असल्याचे सांगताना किसनराव यांचे डोळे पाणवतात. किसन आहिरे यांच्यासारखे अनेक शेतकरी दुष्काळामुळे आपल्या पोरी उजवू शकत नाहीत ही वस्तुस्थिती बीड जिल्ह्यातली आहे.

आमच्या बचत गटातून केली आहे मदत- लक्ष्मी बोरा
केज तालुक्यातील शिंदी येथील शेतकरी किसान अहिरे यांना शासनाची कुठलीच योजना मिळालेली नाही. अशा परिस्थितीत जिजाऊ महिला बचत गटाच्या माध्यमातून आम्ही किसन अहिरे यांना नवचेतना सर्वांगीण विकास केंद्र अंतर्गत चालणाऱ्या ज्ञानेश्वरी महिला बचत गटाच्या माध्यमातून शेळ्या घेण्यासाठी आर्थिक मदत केलेली आहे. शिवाय मुलीच्या लग्नासाठी देखील अहिरे यांना कर्ज दिलेले आहे. त्यांनी ते कर्ज वेळेवर परतफेड केलेले आहे. मात्र आता दुष्काळी परिस्थिती असल्याने कर्ज घेऊन फेडायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्याने मुलीच्या लग्नाचा प्रश्न बिकट बनला आहे. अशी माहिती ज्ञानेश्वरी महिला बचत गटाच्या अध्यक्षा लक्ष्मी बोरा यांनी दिली आहे.

Conclusion:या सगळ्या व्यथा भोगणाऱ्या किसनरावांना मागचा अनेक वर्षात शासनाच्या घरकुल देखील मिळालेलं नाही. दहा बाय दहाच्या दोन पत्र्याच्या खोल्या यातच त्यांचं दहा अकरा माणसांचे कुटुंब कसेबसे राहत आहे. किसन अहिरे यांच्या घरात विजेचे कनेक्शन देखील नाही. इथे खायचे वांदे आहेत तर लाईट बिल भरायचे कुठून? त्यामुळे विजेचे कनेक्शन घेतले नसल्याचे अहिरे यांनी सांगितले.

दिपकच्या भवितव्याची चिंता-
किसन आहिरे यांना सात मुलीनंतर आठवा दिपक नावाचा मुलगा आहे. पैशाअभावी मुलींची शिक्षणा तर बंद पडले आहेत बंद केली आहेत. आता मुलाच्या शैक्षणिक भवितव्याच्या बाबतीत काळजी करताना किसन अहिरे म्हणाले की, आता आमची जिंदगी तर अशीच गेली,पण मुलाच्या शिक्षणाचा काय करावं असा प्रश्न आम्हाला भेडसावतोय. मुलगा आठवीत असून चांगला चित्रकार आहे पण त्याला आमची काहीच मदत होत नसल्याने किसनराव यांनी खंत व्यक्त केली.

मुलीचे लग्न करू न शकणारे अनेक शेतकरी- मनीषा घुले
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या सचिव मनीषा घुले यांनी शेतकऱ्यांच्या या परिस्थितीवर बोलताना सांगितले की सिंधी या गावातील किसन अहिरे हे एक प्रतिनिधीक स्वरूपातील शेतकरी आहेत. बीड जिल्ह्यात किसन आहिरे सारखे दारिद्र्यात जगणारे व मुलीचे लग्न देखील करून शकलेले अनेक शेतकरी दारिद्र्यात जीवन जगत आहेत शासनाच्या कुठलाच योजनांचा त्यांना लाभ झालेला नाही या सगळ्या परिस्थितीचा परिस्थितीचे बीड जिल्ह्यातील पुढाऱ्यांना घेणे-देणे आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांना अशी सगळी परिस्थिती बीड जिल्ह्यात निर्माण झालेली आहे याकडे बीड जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे असे नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या सचिव मनीषा घुले यांनी सांगितले
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.