ETV Bharat / state

बीड : दुष्काळाची दाहकता; पाण्यासाठी करावी लागते मैलों-न-मैलोची पायपीट'

जिल्ह्यातील एकूण १४०४ गावांपैकी ६०६ गावे व ३२० वाड्यांवर भीषण दुष्काळाचे सावट आहे. प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करत आहे. टँकरचे पाणी दूषित असल्याने नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

दुष्काळाची भयानकता; पाण्यासाठी करावी लागते पायपीट
author img

By

Published : May 7, 2019, 10:20 PM IST

बीड - बीड जिल्ह्यातील पाणी पातळी १२ मीटरहून अधिक खोल गेली आहे. जिल्ह्यासह मराठवाडा भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागत आहे. एवढेच नाही तर पाटोदा तालुक्यातील उंबर विहिरा या गावातील अर्धे लोक गावाकडच्या दुष्काळाला वैतागून मुंबई-पुणे येथए स्थलांतरित होत आहेत. बीड जिल्ह्यात १४४ लघु व मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. यातील ५० टक्के लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत.

जिल्ह्यातील एकूण १४०४ गावांपैकी ६०६ गावे व ३२० वाड्यांवर भीषण दुष्काळाचे सावट आहे. प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करत आहे. टँकरचे पाणी दूषित असल्याने नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. सध्या बीड जिल्ह्यात ८५२ टँकर सुरू आहेत. तसे पाहता बीड जिल्ह्यासाठी पाणीटंचाई नवीन नाही मात्र यावर्षी दुष्काळाची भीषणता यापूर्वीच्या दुष्काळापेक्षा तीव्र असल्याच्या भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच यापूर्वी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न फारसा गंभीर नसायचा मात्र यंदा जनावरांना चारा मिळतोय न माणसांना पिण्यासाठी पाणी या दुहेरी कात्रीत सापडलेला बीड जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळला जात आहे.

उंबर विहिरा येथील वस्तुस्थिती..
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील उंबरविहिरा या गावची लोकसंख्या सव्वादोन हजाराच्या जवळपास आहे. या गावात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. मात्र, मागील तीन-चार वर्षापासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळामुळे येथील नागरिकांची मोठी हेळसांड सुरू आहे. गावात दुष्काळ पडला म्हणून सुमारे दीड हजार नागरिकांनी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी कामाच्या शोधात स्थलांतर केले आहे. येथील नागरिकांनी या सगळ्या परिस्थितीबाबत खंत व्यक्त केली. एवढेच नाही तर जिल्हा प्रशासनाकडून रोजगार हमीचे एकही काम या भागात सुरू नसल्याने येथील नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.

आता आडालाही नाही पाणी..
पाटोदा तालुक्यातील उंबरविहिरा येथील एका जून्या झाडाला थोडेबहुत पाणी असायचे. ते पाणी आणि गावातील महिला पोहर्‍याने शेंदून वापरायच्या मात्र तो आडही आटला आहे. सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे गावातील महिलांनी सांगितले.

Intro:दुष्काळाची दाहकता; हंडाभर पाण्यासाठी करावी लागते मैलोनमैल ची पायपीट; बीड जिल्ह्यातील वस्तुस्थिती

बीड- बीड जिल्ह्यातील पाणी पातळी बारा मीटरहून अधिक खोल गेली आहे. भीषण दुष्काळाचा सामना बीड जिल्ह्यासह मराठवाडा करत आहे. हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट महिलांना करावी लागत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात आहे. एवढेच नाही तर पाटोदा तालुक्यातील उंबर विहिरा या गावातील अर्धे लोक गावाकडच्या दुष्काळाला वैतागून मुंबई-पुण्याला स्थलांतरित झाले आहेत. बीड जिल्ह्यात 144 लघु व मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. यातील 50 टक्के लघु प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत तर काही सिंचन प्रकल्प वृत्त साठ्यात आहेत.

Body:बीड जिल्हा कायम दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहे. बीड जिल्ह्यातील एकूण 1404 गावांपैकी 606 गावे व 320 वाड्या वर भीषण दुष्काळाचे सावट आहे. प्रशासन टँकरने पाणीपुरवठा करत आहे. टँकरचे पाणी दूषित असल्याने अनेक आजारांना सर्वसामान्य व गोरगरीब नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. आजघडीला बीड जिल्ह्यात 852 टँकर सुरू आहेत. तसे पाहता बीड जिल्ह्यासाठी पाणीटंचाई नवीन नाही मात्र यावर्षी दुष्काळाची भीषणता इतर वेळी तर दुष्काळावर यापूर्वीच या दुष्काळापेक्षा तीव्र असल्याच्या भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत यापूर्वी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न फारसा गंभीर नसायचा मात्र यंदा जनावरांना चारा मिळतोय न माणसांना पिण्यासाठी पाणी या दुहेरी कात्रीत सापडलेला बीड जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळामुळे होरपळला जातोय.

उंबर विहिरा येथील अशी आहे वस्तुस्थिती-
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील उंबरविहिरा या गावची लोकसंख्या सव्वा दोन हजाराच्या जवळपास आहे या गावात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे मात्र मागील तीन-चार वर्षापासून पडणाऱ्या सततच्या दुष्काळामुळे येथील नागरिकांची ची मोठी हेळसांड सुरू आहे गावात दुष्काळ पडला म्हणून दीड हजार च्या जवळपास नागरिकांनी मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी कामाच्या शोधात स्थलांतर केलेआहे केले आहे. येथील नागरिकांनी या सगळ्या परिस्थितीबाबत खंत व्यक्त केली. एवढेच नाही तर जिल्हा प्रशासनाकडून रोजगार हमीचे एकही काम या भागात सुरू नसल्याने येथील नागरिकांच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.

आता आ आडालाही राहिले नाही पाणी-
पाटोदा तालुक्यातील उंबरविहिरा येथील एका जून्या झाडाला थोडेबहुत पाणी असायचे ते पाणी आणि गावातील महिला पोहर्‍याने शेंदून वापरायच्या मात्र तो आडही आटला असल्याने आमच्या पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न गंभीर बनला आहे. असे गावातील महिलांनी सांगितले.

Conclusion:उन्हाळ्याचे अजून सव्वा ते दीड महिना बाकी आहे. या दरम्यान पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांचा चारा व हाताला काम मिळेल का? याची भ्रांत गोरगरीब नागरिकांना लागलेली आहे. एकंदरीत बीड जिल्ह्यात मराठवाड्यात दुष्काळाचा मोठा फटका बसत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.