ETV Bharat / state

सरकारच्या धोरणामुळे राज्यातील डॉक्टर असुरक्षित - आयएमए

डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा कायदा करण्याच्या कामाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी डॉक्टरांनी केला. येणाऱ्या काळात डॉक्टरांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न जटिल बनत असल्याच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली.

आयएमए
author img

By

Published : Mar 31, 2019, 7:28 PM IST

बीड - सरकारच्या डॉक्टर विरोधातील धोरणामुळे आम्ही असुरक्षित बनल्याचा आरोप इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी केला आहे. बीडमध्ये तसेच, देशात आणि राज्यात डॉक्टरांच्या विरोधातील शासकीय धोरणामुळे खासगी क्षेत्रात प्रॅक्टिस करणारे सर्वच डॉक्टरांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव सुहास पिंगळे व नियोजित अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी असे मत व्यक्त केले.

आयएमए

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांची रविवारी बीडमध्ये बैठक झाली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा कायदा करण्याच्या कामाकडे हे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी डॉक्टरांनी केला. येणाऱ्या काळात डॉक्टरांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न जटिल बनत असल्याच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. मागील पाच वर्षात डॉक्टरांच्या सुरक्षिततेसंदर्भात एकही सकारात्मक निर्णय या सरकारने घेतलेला नसल्याचे पाहायला मिळते. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी खासगी प्रॅक्टिस करायची कशी? असा प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना डॉक्टरांनी खंत व्यक्त केली.

महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन संबंधित सर्व प्रमुख पक्षांना येणाऱ्या काळात डॉक्टरांच्या समस्यावर मार्ग काढण्याबाबत विनंती करण्यात येत असल्याचे असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले. मागील पाच वर्षात वेळोवेळी शासनाकडे आम्ही मागण्या मांडून देखील कुठल्याच मागण्यांची पूर्तता भाजप सरकारने केली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बैठकीला इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होजी कपाडिया, डॉ. अविनाश भोंडवे, सेक्रेटरी सुहास पिंगळे, सहसचिव संतोष कुळकर्णी, डॉ. रामकृष्ण लोंढे, डॉ. जयंत नवरंगे, डॉ. अनिल बारकुल उपस्थित होते.

Intro:सरकारच्या डॉक्टर विरोधातील धोरणामुळे आम्ही असुरक्षित; इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांचा आरोप

बीड देशात व राज्यात डॉक्टरांच्या विरोधातील धोरण राबवण्याचे काम शासकीय पातळीवर हे सरकार करत असल्यामुळे संपूर्ण खाजगी क्षेत्रात प्रॅक्टिस करणारे डॉक्टर असुरक्षित असल्याची भावना इंडियन मेडिकल असोसिएशनचे सेक्रेटरी सुहास पिंगळे व नियोजित अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी रविवारी बीडमध्ये बोलून दाखवली. आरोग्य क्षेत्रात काम करणारी इंडियन मेडिकल असोसिएशन ही संघटना देशपातळीवर काम करणारी मोठी संघटना आहे. असे असताना देखील डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा कायदा करण्याच्या कामाकडे हे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी डॉक्टरांनी केला.

Body:इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांची रविवारी बीडमध्ये एक बैठक झाली. येणाऱ्या काळात डॉक्टरांच्या सामाजिक सुरक्षेचा प्रश्न जटिल बनत असल्याच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. मागील पाच वर्षात डॉक्टरांच्या सुरक्षिततेसंदर्भात एकही सकारात्मक निर्णय या सरकारने घेतलेला नसल्याचे पाहायला मिळते. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी खाजगी प्रॅक्टिस करायची कशी? असा प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये बैठका घेऊन संबंधित सर्व प्रमुख पक्षांना येणाऱ्या काळात डॉक्टरांच्या समस्यावर मार्ग काढण्याबाबत विनंती करण्यात येत असल्याचे असोसिएशनच्या सदस्यांनी सांगितले.

Conclusion:यावेळी ईटीव्ही भारत शी बोलताना डॉक्टरांनी खंत व्यक्त केली. मागील पाच वर्षात वेळोवेळी शासनाकडे आम्ही आमच्या मागण्या मांडून देखील कुठल्याच मागण्यांची पूर्तता भाजप सरकारने केली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी बैठकीला इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष होजी कपाडिया, डॉ. अविनाश भोंडवे, सेक्रेटरी सुहास पिंगळे , सहसचिव संतोष कुळकर्णी, डॉ. रामकृष्ण लोंढे, डॉ. जयंत नवरंगे, डॉ. अनिल बारकुल यांची उपस्थिती होती.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.