ETV Bharat / state

Dhananjay Munde Statement : औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न सोडवा; धनंजय मुंडे यांचे फडणवीसांना निवेदन

author img

By

Published : Dec 28, 2022, 5:17 PM IST

औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न तातडीने सोडवण्याबाबत धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांकडे मागणी ( Dhananjay Mundes Request to Fadnavis ) केली आहे. परळी वैद्यनाथ व अन्य औष्णिक विद्युत ( Immediately Solve Issue of Job of Project Victims ) केंद्रातील प्रकल्पग्रस्तांच्या ( Job of Project Victims in Thermal Power Station ) मागण्यांसादर्भात धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एकही प्रकल्पग्रस्त उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही - फडणवीसांनी असे आश्वासन दिले आहे.

Dhananjay Mundes Request to Fadnavis to Immediately Solve Issue of Job of Project Victims in Thermal Power Station
औष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न सोडवा; धनंजय मुंडे यांचे फडणवीसांना निवेदन

बीड : औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांना नोकरी देण्याची मागणी ( Dhananjay Mundes Request to Fadnavis ) परळी वैद्यनाथसह राज्यातील विविध औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पग्रस्त उमेदवारांना ( Immediately Solve Issue of Job of Project Victims ) शासकीय नियमाप्रमाणे नोकरी देणे व अन्य मागण्या ( Job of Project Victims in Thermal Power Station ) तातडीने मान्य करण्यात याव्यात, अशी मागणी माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी आज उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

धनंजय मुंडे यांची हिवाळी अधिवेशनादरम्यान देवेंद्र फडणवीस भेट धनंजय मुंडे यांनी सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. यावेळी ऊर्जा प्रकल्पांसाठी जमिनी संपादित केलेल्या एकही प्रकल्पग्रस्त उमेदवारावर अन्याय होऊ देणार नाही, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना दिले आहे.

परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रामधील प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतिक्षेत परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्रामधील काही प्रकल्पग्रस्त नागरिक अद्यापि न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सरकारने वेळोवेळी नियम बदल केल्याने अनेकजण अद्यापि नोकरी मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. अनेक प्रकल्पग्रस्त 45 वर्ष वयाची मर्यादा ओलांडल्याने आता आपल्याला नोकरी मिळणार की नाही, मिळणाऱ्या निर्वाह भत्त्यात वाढ होणार की नाही, या चिंतेत आहेत.

धनंजय मुंडेंनी केली न्याय देण्याची मागणी त्या सर्वांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घ्यावी, अशी मागणी आ. मुंडे यांनी केली. काही प्रकल्पग्रस्त उमेदवारांची जमीन औष्णिक विद्युत प्रकल्पाने संपादित केली आहे. मात्र, प्रकल्पाच्या विस्तारामध्ये काही वर्षांनी आम्हाला आता या जमिनीची आवश्यकता नसल्याने तुम्ही प्रकल्पग्रस्त कोट्यातून पात्र नसल्याचे उमेदवारांना कळवण्यात आले आहे.

जमिनी संपादित झाल्या तेव्हाच प्रकल्पग्रस्त म्हणून पात्र जमिनी संपादित झाल्या तेव्हाच हे उमेदवार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र घेऊन पात्र ठरले. तेव्हा त्यांनाही न्याय देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, असेही चर्चेदरम्यान धनंजय मुंडे म्हणाले. या प्रकारातील उमेदवारांनादेखील न्याय देण्याची तसेच प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्या मार्गी लावण्याची सरकारची भूमिका असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

परळी वैद्यनाथ तालुक्यातील दाऊतपूर येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादित परळी वैद्यनाथ तालुक्यातील दाऊतपूर येथील गट न. 232, 238, 239 व 240 मधील सामायिक जमीन संपादित केलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी सेवेत सामावून घेणे, कनिष्ठ प्रयोगशाळा रसायनशास्त्र या पदावर पात्र असलेल्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांना सामावून घेणे, प्रकल्पग्रस्त व संबंधित नातेवाईकांची न्याय्य प्रकरणे यांसह विविध मागण्यांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.