पुणे - मुंडे यांना जितक्या दिवस रुग्णालयात ठेवायचे आहे तितक्या दिवस रुग्णालयात ठेवा. (Dhananjay Munde fractured two ribs) मात्र, ते पुर्णपणे बरे झाले पाहिजेत. तसेच, कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, मुंडे यांना आरामाची गरज आहे. मुंडे यांची ७वी आणि ८वी बरगडी फ्रॅक्चर झाली असून, त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे असही पवार यावेळी म्हणाले आहेत.
उपचारासाठी ब्रिज कँडी रुग्णालयात : मंगळवारी धनंजय मुंडे आपल्या मतदारसंघातून परळी येथे असलेल्या निवासस्थानी जात असताना रात्रीच्या सुमारास धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला अपघात भीषण होता. मात्र, अपघात झाल्या क्षणी एअर बॅग उघडल्यामुळे धनंजय मुंडे यांना जास्त मार लागलेला नाही. मात्र या अपघातात त्यांच्या छातीला फटका बसल्यामुळे छाती खालील बरगड्यांमध्ये फ्रॅक्चर झाला असल्यास निष्पन्न झाला आहे. त्याच्यात उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.
अपघात टाळावा यासाठी अजित पवारांनी दिला सल्ला : गेल्या काही महिन्यात सातत्याने महाराष्ट्रातील नेत्यांच्या गाडीच्या अपघाताचे प्रकार वाढत आहेत. चार महिन्यापूर्वी विनायक मेटे यांनी कार अपघातात आपला जीव गमावला. त्यामुळे अजित पवार यांनी महाराष्ट्रातील सर्व नेत्यांना गाडी सावकाश चालवण्याचं आवाहन केलं आहे. यासोबतच शक्यतो गाडीतून प्रवास करत असताना ड्रायव्हर सोबत असणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं यासोबतच मध्यरात्री गाडी चालवणे कटाक्षाने टाळले पाहिजे असा सल्ला अजित पवार यांनी सर्व नेत्यांना दिला आहे.
मुक्ताताईंची आठवण - आमच्या भगिनी मुक्त टिळक यांनी पुण्याचे महापौर पद भूषवले. सर्वांना सोबत घेऊन नगरसेविका म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर प्रथम नागरिक म्हणून महापौर पद भूषवले. पुढे त्या आमदार झाल्या विधिमंडळात आम्ही एकत्र काम केले. पालकमंत्री म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम केला आहे. मी त्यांचे काम जवळून पाहिला आहे. मीटिंगमध्ये एकत्र आमची भेट व्हायची त्या पुण्याच्या प्रश्नाबाबत कसबा विधानसभा मतदारसंघांबाबत महिलांचे प्रश्न मुक्ताताई सतत मांडायच्या परंतु काही आजार इतके गंभीर असतात की त्यात विज्ञान इतके पुढे गेलेला असतानाही अत्याधुनिक साधन सामग्री असतानाही डॉक्टर चांगले असतानाही तरी त्या गंभीर आजारातून काही जण बाहेर येऊ शकत नाही. जसे लक्ष्मण जगताप यांच्या बाबतीत घडले तशाच प्रकारची घटना आमच्या भगिनी मुक्ताताई यांच्याबाबत घडली अशी प्रतिक्रिया पवार यांनी यावेळी दिली आहे.