ETV Bharat / state

कार्तिकी पौर्णिमेनिमित्त कपिलधार येथे यात्रेचे आयोजन; राज्यासह परराज्यातूनही भाविकांची गर्दी - lingayat

बीड ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी आढाव घेऊन सूचना दिल्या. ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुजित बडे सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. मंगळवारी बंदोबस्त वाढविण्यात येणार असून, मंदिर प्रशासनाचे शंभर स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीला असतील.

कपीलधार येथील यात्रा
author img

By

Published : Nov 12, 2019, 7:52 PM IST

बीड - तालुक्यातील कपिलधार वाडी येथील यात्रा महोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. कार्तिकी पौर्णिमेच्या निमित्ताने दरवर्षी येथे यात्रेचे आयोजन करण्यात येते. महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखो भाविक दिंड्या घेऊन कपिलधार वाडी येथे आले आहेत. भाविकांच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

भाविकाची प्रतिक्रिया

वीरशैव समाजाचे श्रध्दास्थान संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार (ता. बीड) येथे यंदा कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सवाला सुरुवात झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटकातून भाविकांच्या दिंड्या कपिलधारकडे येऊ लागल्या आहेत. मंगळवारी श्री मन्मथ स्वामींच्या समाधीला अभिषेक करून महापूजा करण्यात आली. दरवर्षी कपिलधार येथे कार्तिकी पौर्णिमेला लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षीही १२ नोव्हेंबर रोजी यात्रा होत आहे.

हेही वाचा - रुग्ण दगावल्याने संतप्त नातेवाईकांची रुग्णालय कर्मचाऱ्यांना मारहाण, बीडमधील घटना

राज्यासह परराज्यातूनही भाविकांची गर्दी

या उत्सवासाठी राज्यासह कर्नाटक व आंध्रप्रदेशातून भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. राष्ट्रसंत डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी ही यात्रोत्सव व दिंडी परंपरा सुरु केली. अहमदपूर येथून त्यांची यात्राही मंगळवारी कपिलधार येथे दाखल झाली. पाठोपाठ वसमत, गडगा, बिचकुंदा, तमलूर येथील दिंड्यांमध्ये भाविकांच गर्दी असते. एकूण ४५ दिंड्या कपिलधारमध्ये दाखल होणार आहेत.
दिंड्या कपिलधारच्या दिशेने निघाल्या असून, वाटेत ठिकठिकाणी भाविकांसाठी फराळ, चहा, पाण्याची मोफत व्यवस्था विविध मंडळे व साामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण मंडळी मन्मथ ज्योतही आणणार आहेत. मंदिर परिसरात खेळण्या, खाऊ, फराळ, सजावट अशी विविध दुकाने थाटण्यात आली आहेत.

सुरक्षेसाठी पोलीस तैनात
बीड ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी आढाव घेऊन सूचना दिल्या. ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सुजित बडे सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. मंगळवारी बंदोबस्त वाढविण्यात येणार असून, मंदिर प्रशासनाचे शंभर स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीला असतील.

हेही वाचा - बीडमध्ये चौथीत शिकणाऱ्या मुलीचे 30 हजार घेऊन लग्न लावण्याचा प्रयत्न

शिवनाम स्मरणात भाविक मंत्रमुग्ध
यात्रेचे औचित्य साधून ६ नोव्हेंबरपासून कपिलधार येथे अखंड शिवनाम सप्ताहाला सुरुवात झाली. या सप्ताहाचा समारोप मंगळवारी होणार आहे. दरम्यान, सोमवारी मंदिरात पारायणासाठी भाविकांची गर्दी झाली होती.भजन, शिवपाठ, परमरहस्य पारायण आदी कार्यक्रम भक्तीमय वातावरणात सुरू होते. विविध ठिकाणाहून आलेले भाविक शिवनाम स्मरणात मंत्रमुग्ध झाले होते. महापूजेनंतर डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज हे मांजरसुंबा रोडलगत धर्मसभा घेऊन मागदर्शन केले. रात्री मंदिर परिसरात त्यांचे प्रवचन होणार असून त्यानंतर यात्रोत्सवाचा समारोप होईल.

Intro:

कार्तिक पौर्णिमेनिमित्त कपिलधार यात्रा: महाराष्ट्रासह आंध्र, कर्नाटकातून लाखो भाविकांचे आगमन

बीड- सालाबादाप्रमाणे याही वर्षी कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने कपिलधार वाडी येथे यात्रा महोत्सवाला मंगळवार पासून प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातून लाखो भाविक दिंड्या घेऊन कपिलधार वाडी येथे आले आहेत.

वीरशैव समाजाचे श्रध्दास्थान संत शिरोमणी मन्मथस्वामी महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र कपिलधार (ता. बीड) येथे यंदा कार्तिकी पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सवाला सुरुवात झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यासह आंध्रप्रदेश, कर्नाटकातून भाविकांच्या दिंड्या कपिलधारकडे आगमन करु लागल्या आहेत. मंगळवारी श्री मन्मथ स्वामींच्या समाधीला अभिषेक करून महापूजा करण्यात आली दरवर्षी कपिलधार येथे कार्तिकी पौर्णिमेला लाखो भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षीही १२ नोव्हेंबर रोजी यात्रा होत आहे. या उत्सवासाठी राज्यासह कर्नाटक व आंध्रप्रदेशातून भाविक लाखोंच्या संख्येने गर्दी करतात. राष्ट्रसंत डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज यांनी हा यात्रोत्सव व दिंडी परंपरा सुरु केली. अहमदपूर येथून त्यांची यात्राही मंगळवारी कपिलधार येथे दाखल झाली. दरम्यान, त्यांच्या दिंडीत सर्वाधिक भाविक सहभागी असतात. पाठोपाठ वसमत, गडगा, बिचकुंदा, तमलूर येथील दिंड्यांमध्ये भाविकांची गदीे असते. एकूण ४५ दिंड्या कपिलधारमध्ये दाखल होणार आहेत. दिंड्या कपिलधारच्या दिशेने निघाल्या असून वाटेत ठिकठिकाणी भाविकांसाठी फराळ, चहा, पाण्याची मोफत व्यवस्था विविध मंडळे व साामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण मंडळी मन्मथ ज्योतही आणणार आहेत. मंदिर परिसरात खेळण्या, खाऊ, फराळ, सजावट अशी विविध दुकाने थाटण्यात आली आहेत. बीड ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उपअधीक्षक भास्कर सावंत यांनी आढाव घेऊन सूचना दिल्या. ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक सुजित बडे सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. मंगळवारी बंदोबस्त वाढविण्यात येणार असून मंदिर प्रशासनाचे शंभर स्वयंसेवक पोलिसांच्या मदतीला राहतील.

शिवनामस्मरणात भाविक मंत्रमुग्ध

यात्रेचे औचित्य साधून ६ नोव्हेंबरपासून कपिलधार येथे अखंड शिवनाम सप्ताहाला सुरुवात झाली. या सप्ताहाचा समारोप मंगळवारी होणार आहे. दरम्यान, सोमवारी मंदिरात पारायणासाठी भाविकांची गर्दी झाली होती.भजन, शिवपाठ, परमरहस्य पारायण आदी कार्यक्रम भक्तीमय वातावरणात सुरू होते. विविध ठिकाणाहून आलेले भाविक शिवनामस्मरणात मंत्रमुग्ध झाले होते. महापूजेनंतर डॉ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज हे मांजरसुंबा रोडलगत धर्मसभा घेऊन मागदर्शन केले. रात्री मंदिर परिसरात त्यांचे प्रवचन होणार असून त्यानंतर यात्रोत्सवाचा समारोप होईल.
Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.