ETV Bharat / state

बीड : वाळू माफियाकडून लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्याला अटक - beed deputy Collector arrested news

वाळू माफियांकडून 65 हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड याला एसीबीच्या पथकाने गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान रंगेहात पकडले. ही कारवाई जालना येथील एसीबीच्या पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे केली.

deputy Collector arrested for taking bribe from sand mafia in beed
बीड : वाळू माफियाकडून लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्याला अटक
author img

By

Published : Feb 19, 2021, 2:09 AM IST

बीड - अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांकडून 65 हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड याला एसीबीच्या पथकाने गुरुवारी रात्री आठच्या दरम्यान रंगेहात पकडले. ही कारवाई जालना येथील एसीबीच्या पथकाने बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे केली. या कारवाईत महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी गळाला लागल्यामुळे मोठी खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

चालकासह उपजिल्हाधिकाऱ्याला अटक -

मागील पंधरा दिवसांपासून बीड जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतूक रोखण्यात आली होती. ही वाहतूक पुन्हा अवैधपणे सुरू करण्यासाठी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी वाळूमाफियाकडे पैशाची मागणी केली होती. याची माहिती जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर गुरुवारी रात्री सापळा रचण्यात आला. एसीबीने रचलेल्या सापळ्यात उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड अडकले. वाळूच्या गाड्या सुरू राहू देण्यासाठी संबंधित वाळू ट्रकच्या चालकाकडून 65 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गायकवाड यांना रंगेहात पकडले. या प्रकरणात श्रीकांत गायकवाड यांच्या चालकासह स्वतः गायकवाड यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. गुरुवार रात्री उशिरापर्यंत गायकवाड यांची कसून चौकशी सुरू होती.

अनेक दिवसांपासून होत्या तक्रारी -

माजलगाव तालुक्यातून अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांकडे आल्या होत्या. अनेक दिवसांपासून एसीबीचे अधिकारी सापळा रचत होते. अखेर गुरुवारी जालना एसीबीच्या अधिकाऱ्यांना यश आले. महसूल विभागातील वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा - भोकरदन तालुक्यासह शहरात मुसळधार पाऊस, गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.