परळी वैजनाथ (बीड) - पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्राम पंचायत यांच्या वतिने सुरू असलेल्या कोविड केअर सेंटरला पंचायत समितीचे उपसभापती जानिमिया कुरेशी यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित आरोग्य कर्मचारी व रुग्णांशी संवाद साधून विचारपूस केली.
हेही वाचा - मुंबई - बेकायदेशीर ऑक्सिजन सिलेंडरचा साठा; 6 लाख 86 हजारांच्या मुद्देमालासह दोन जणांना अटक
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येविरुद्ध कंबर कसली आहे. मुंडेंच्या संकल्पनेतून कृषी उत्पन्न बाजार समिती व सिरसाळा ग्रामपंचायत यांच्या वतिने सिरसाळा येथे 50 बेडचे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरला रविवार (दि.23 मे) पंचायत समितीचे उपसभापती जानिमिया कुरेशी यांनी सदिच्छा भेट दिली. या कोविड सेंटरमध्ये कोरोनबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. सिरसाळा परिसरातील रुग्णांना हे कोविड सेंटर आधार बनले आहे.
कोरोना सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, त्यांची घेतली जाणारी काळजी, तसेच डॉक्टर, नर्स, स्टाफ यांचे असणारे योगदान याचे कुरेशी यांनी कौतुक केले. अशा विविध गोष्टी संदर्भात त्यांनी माहिती घेतली. यावेळी डॉ. शेख व इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा - बीडमध्ये कोरोनाबाधिताची आत्महत्या; गळफास घेत संपविले जीवन