ETV Bharat / state

औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे पिकांचे नुकसान

परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. वीज निर्मिती केंद्रातील प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच आहे, मात्र औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे परिसरातील पिके धोक्यात आली आहेत.

author img

By

Published : Feb 3, 2021, 8:03 PM IST

औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे पिकांचे नुकसान
औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे पिकांचे नुकसान

परळी (बीड) परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. वीज निर्मिती केंद्रातील प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच आहे, मात्र औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे परिसरातील पिके धोक्यात आली आहेत.

वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडत असलेल्या पांढऱ्या व कोळशाच्या राखेमुळे आमचे पीक धोक्यात आल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. तसेच पिकांची नासाडी होत असल्याने नुकसान भरपाईची देखील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. नुकसान भरपाई न मिळाल्यास 12 फेब्रुवारीला आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी हरीष नागरगोजे यांनी दिला आहे.

राखेमुळे पिकांचे नुकसान

परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचबरोबर या राखेमुळे शेतीचे देखील मोठे नुकसान होत आहे. औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या पश्चिमेस असलेल्या शेतकऱ्यांना थर्मलमधून बाहेर पडणाऱ्या पांढऱ्या राखेबरोबरच काळ्या राखेचा देखील सामना करावा लागत आहे. वीज निमिर्तीसाठी येणारी राख ज्या ठिकाणी खाली होते, त्याठिकाणी धुराचे लोट निघट आहेत. त्याचा परिणाम परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांवर झाला असून, राखीमुळे पूर्ण पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून, आमच्या पिकांची नुकसान भरपाई द्यावी, तसेच कोळसा हाताळणी विभागाचे अधिक्षक अभियंत्याच्या कारभाराची चौकशी करावी, त्यांचे निलंबन करावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास येत्या 12 फेब्रुवारीपासून आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.