ETV Bharat / state

धक्कादायक: अल्पवयीन मुलीवर ६ महिन्यांत पोलिसासह ४०० हून अधिकांनी केला बलात्कार, ४ आरोपी ताब्यात - बाल कल्याण समिती

अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी आतापर्यंत चौघा जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या मुलगी 20 आठवड्यांची गर्भवती असल्याने एमटीपी साठी जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. यापुढे तिच्या जबाबानुसार आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून अत्याचार करणारे ते दोन पोलीस कोण? याचाही तपास पोलीस करणार आहेत.

file photo
file photo
author img

By

Published : Nov 16, 2021, 6:49 AM IST

Updated : Nov 16, 2021, 3:24 PM IST

बीड - राज्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या (Child sexual abuse) घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अशीच अंगावर शहारे आणणारी एक घटना समोर आली आहे. चक्क सोळा वर्षाच्या (अल्पवयीन) मुलीवर सहा महिन्यात चारशेहून अधिक व्यक्तींनी अत्याचार केले असल्याची घटना समोर आल्याने बाल कल्याण समिती अध्यक्ष तथा प्रथम वर्ग दंडाधिकारी डॉ.अभय वनवे यांनी चिंता व्यक्त करत 'ईटीव्ही भारत' शी बोलताना संगितले की, संबंधीत अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीचे अनेकांनी अत्यंत क्रुरतेने शोषण केलेले आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यात चारशेहून अधिक व्यक्तींनी अत्याचार केले आहे. यात एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील समावेश असून संबंधित अल्पवयीन मुलगी वीस आठवड्याची गर्भवती आहे. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात (Beed District Hospital) दाखल करण्यात येणार आहे. याची चौकशी करण्याच्या सुचना आम्ही दिलेल्या असल्याचे डॉ. वनवे म्हणाले.

अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यात चारशेहून अधिकांनी केले अत्याचार

या प्रकरणातील मुलगी ही अल्पवयीन आहे. त्यामुळे हा गंभीर प्रकार असल्याचेही बाल कल्याण समितीच्या सदस्यांनी म्हटले आहे. याबाबत बीड पोलिसांनी (Beed police) पुरवणी जबाब घेतला असून त्यामध्ये मुलीने म्हटले आहे की, चारशेहून अधिक व्यक्तींकडून माझ्यावर अत्याचार झालेला आहे. सहा महिने मी अत्यंत वाईट स्थितीत जगलेली आहे. या प्रकरणात अत्यंत वाईट बाब म्हणजे अत्याचार करणाऱ्यांमध्ये दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याचे पीडित अल्पवयीन मुलीने आपल्या जबाबात सांगितले आहे. अशी माहिती बाल कल्याण समितीचे अध्यक्ष तथा प्रथम वर्ग दंडाधिकारी डॉ. अभय वनवे यांनी सांगितले आहे. याप्रकरणी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सध्या मुलगी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. सदरील अल्पवयीन मुलगी 20 आठवड्यांची गर्भवती असून तिला एमटीपी साठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याचेही डॉक्टर वनवे म्हणाले.
पोलिसांनी दखल घेतली नाही -

सामाजिक कार्यकर्ते तथा बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांच्याकडे दोन दिवसापूर्वी एक तक्रार आली. या तक्रारीवरून केलेल्या तपासात गंभीर बाब समोर आली आहे. या संदर्भात माहिती देताना बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. अभय वनवे म्हणाले की, जिल्ह्यातील कुंबेफळ थेथील एका सोळा वर्षाच्या मुलीची ट्रॅझेडी अक्षरश: अंगावर शहारे आणणारी आहे. लहान असतानाच आईचे छत्र हारवले. सात-आठ महिन्यापूर्वी वडिलांनी अल्पवयातच लग्न लावून दिले. सासरी नवरा संभाळत नसल्याने ती अल्पवयीन मुलगी वडिलांकडे रहायला आली. परंतू वडिलांनी देखील तिला संभाळण्यासाठी नकार दिला. अशा परिस्थितीत त्या मुलील अंबाजोगाई येथील बसस्थानकांवर भीक मागून स्वत:चा उदरनिर्वाह करावा लागला. याच दरम्यान तिला अत्यंत वाईट घटनांना सामोरे जावे लागले असल्याचे संबंधीत अल्पवयीन मुलीने बालकल्याण अधिकारी यांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.

आतापर्यंत चौघे ताब्यात -

अल्पवयीन मुलीच्या जबाबावरून पोलिसांनी आतापर्यंत चौघा जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या मुलगी 20 आठवड्यांची गर्भवती असल्याने एमटीपी साठी जिल्हा रुग्णालयात दाखल आहे. यापुढे तिच्या जबाबानुसार आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून अत्याचार करणारे ते दोन पोलीस कोण? याचाही तपास पोलीस करणार आहेत.

काय म्हटलेय जबाबात-

अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीने बालकल्याण समितीच्या प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्याकडे दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, माझ्यावर अनेकांनी अत्याचार केला. याबाबत मी तक्रार घेवून अंबाजोगाई येथील पोलिस ठाण्यात अनेकवेळा गेले. मात्र संबंधीत पोलिसांनी मला अनेकदा तेथून हूसकावून लावले. माझे म्हणणे ऐकून सुध्दा दोषीवर कारवाई केली नाही. एवढेच नाही तर एका पोलिस कर्मचा-याने देखील माझ्यावर अत्याचार केलेला आहे. असे त्या पिडीत अल्पवयीन मुलीने जबाबात म्हटले आहे.

Last Updated : Nov 16, 2021, 3:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.