बीड - बीड जिल्हा परिषद अंतर्गत 52 शिक्षक बोगस असल्याची बातमी दोन दिवसापूर्वीच ईटीव्हीने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी बोगस शिक्षकांना निलंबित केले आहेत. बीड जिल्ह्यात दिव्यांग शिक्षक फेर तपासणी करण्यात आली होती. त्याच्यामध्ये 148 पैकी 52 शिक्षकांते बोगस प्रमाणपत्र आढळून आले होते.
52 बोगस शिक्षकांना दणका : बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी जिल्हा परिषद अंतर्गत असणाऱ्या सर्वच शिक्षकांची तपासणी केली होती. याच तपासणीत 52 बोगस शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांच्यामुळे खऱ्या दिव्यांगांना न्याय मिळणार असल्याची चर्चा सध्या बीडात सुरु आहे.
फेर तपासणीत गौडबंगाल उघड : बीड जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या बदल्यामध्ये 336 शिक्षक संवर्ग, एक दिव्यांग, दुर्ग दुर्धर आजारा असल्याचे शिक्षकांनी सांगितले होते. यातील 223 शिक्षकांचे आजार दिव्यांगत्व आणि त्यांच्याकडील प्रमाणपत्राची तपासणी करण्यात अली. ही तपासणी आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात करण्यात आली. यातील 148 शिक्षकांचा अहवाल सीईओ अजित पवार यांच्याकडे प्राप्त झाला. यातील 52 शिक्षक बोगस निघाले आहेत. तसेच या अहवाला 30 टक्के शिक्षक बोगस असल्याचे म्हटले आहे.
खऱ्या मिळणार दिव्यांगाना न्याय : मुख्य कार्यकारी अजित पवार यांनी दिव्यांग बोगस शिक्षक मोहिमेला खऱ्या अर्थाने यश मिळवून दिले आहे. विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद अंतर्गत 15 हजार शिक्षक आहेत. यातील फक्त 1 हजार 500 शिक्षकांचीच तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये 336 शिक्षक निघाले आहेत. यातील 200 शिक्षकांची फेर तपासणी करण्यासाठी आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात या पाठवण्यात आले होते. त्यातील 52 शिक्षक बोगस निघाल्यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
बोगस प्रमाणपत्रांचा सुळसुळाट - शिक्षकांनी स्वतःला दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन अनेक योजनांचा लाभ घेतला आहे. त्यामध्ये बस प्रवासाबरोबरच इन्कम टॅक्समध्येही सूट मिळवली आहे. जिल्ह्यात विविध भागात अनेक धडधाकट मंडळींनी दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे सोयीच्या जागा, बस प्रवासात सूट तसेच इतर लाभ घेतल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत होता. जिल्ह्यात साधारण 12 हजार अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर आहेत. संवर्ग एकच्या बदल्यामध्ये दीड हजारात तब्बल 336 लोकांकडे अशी दिव्यांग, दुर्धर आजाराची प्रमाणपत्र आढळले आहेत. त्यातील दोनशे प्रमाणपत्राची फेर तपासणी आंबेजोगाईच्या रुग्णालयात चौकशीसाठी पाठवण्यात आले. याच आधारे 52 शिक्षक बोगस आढळून आले.