ETV Bharat / state

BJP MLA Laxman Pawar : भाजप, ठाकरे गटाचे कार्यकर्ते भीडले, आ. लक्ष्मण पवार यांच्या प्रचार सभेत गोंधळ - प्रचार सभेत गोंधळ

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारानिमित्त भाजपचे आमदार लक्ष्मण सभा घेत होते. सभा सुरू असतानाच सभेत मोठा गोंधळ (chaos at public campaign meeting) उडाला. आमदार पवार यांनी आक्षेपहार्य विधान केल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यामुळे भाजप कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. तसेच आमदार लक्ष्मण पवार यांनी एका पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याला देखील शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली (public campaign meeting of BJP MLA Laxman Pawar) आहे.

BJP MLA Laxman Pawar
भाजपचे आमदार लक्ष्मण पवार
author img

By

Published : Dec 15, 2022, 2:16 PM IST

बीड : सध्या बीड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. याच निवडणुकीच्या प्रचारानिमित्त भाजपचे आमदार लक्ष्मण पवार (BJP MLA Laxman Pawar) गेवराई तालुक्यातील रुई येथे सभा घेत असताना सभेत मोठा गोंधळ उडाला. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. या सभेसाठी लक्ष्मण पवार यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात सभेला हजर होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी विरोधकाबद्दल थेट आरोप केल्याने विरोधी घटनेमुळे घातला आमदाराच्या सभेत गोंधळ झाल्याने गेवराई पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राठोड यांच्यासह गेवराई पोलीसांनी रुई या गावात जाऊन लोकांत सामंजस्य व शांतता राखण्याचे आवाहन केले (Confusion at public campaign meeting in Beed) आहे.

सभेत गोंधळ : बीडच्या गेवराई तालुक्यातील रुई गावात, भाजप आमदार लक्ष्मण पवार यांच्या काल रात्री आयोजित केलेल्या जाहीर सभेत गोंधळ उडाला आहे. यावेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित जाहीर सभेत, आमदार लक्ष्मण पवार यांनी आक्षेपहार्य विधान केल्याचा आरोप करत, उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. यामुळे भाजप कार्यकर्ते आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. तर यावेळी ग्रामस्थांनी देखील आमदार पवार यांना घेराव घालत, मोठा गोंधळ करत सभा उधळून लावल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यावेळी आमदार लक्ष्मण पवार यांनी, एका पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्याला देखील शिवीगाळ केल्याची देखील प्राथमिक माहिती समोर आली (public campaign meeting of BJP MLA Laxman Pawar) आहे.

गुन्हा दाखल : तर या घटनेची माहिती कळताच पोलीस उपाधीक्षक स्वप्निल राठोड घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी राठोड यांच्यासह पोलीस अधिकारी अन कर्मचारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत रुई गावात तळ ठोकून उभे होते. तर घटना घडूनही दोन्ही गटाकडून अद्याप पोलीसात तक्रार दाखल नाही. मात्र बीडच्या तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये, गावात गोंधळ घालत आचारसंहिता भंग करत शांतता भंग केल्याप्रकरणी, पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सभा रद्द : आमदार लक्ष्मण पवारांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करून सुरू असलेल्या प्रचार सभेत शिवसैनिकांसह ग्रामस्थांनी गोंधळ घातला. यावेळी आमदार पवार यांना घेराव घातल्याने सभा रद्द करण्यात आली. घटनेची माहिती करतात पोलीस उपअधीक्षक स्वप्निल राठोड यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले होते. तर यावेळी एका पोलीस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याला आमदार लक्ष्मण पवारांनी शिवीगाळ केल्याचे प्राथमिक माहिती‌ आहे. तर या घटनेमुळे अद्यापही गावात तणावाचे वातावरण आहे. दरम्यान बीडच्या तलवाडा पोलीस ठाण्यामध्ये, गावात गोंधळ घालत आचारसंहिता भंग करत शांतता भंग केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला (public campaign meeting in Beed) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.