ETV Bharat / state

कार आणि टँकरच्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू; बीड जिल्ह्यातील गेवराईजवळील घटना - गेवराईजवळ अपघात

कार आणि टँकरचा भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील पाच जणांपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमी एकाला उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. आज (गुरुवार) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला.

बीड
बीड
author img

By

Published : Nov 26, 2020, 3:48 PM IST

Updated : Nov 26, 2020, 4:40 PM IST

बीड : धुळे-सोलापूर महामार्गावर गेवराई शहराच्या जवळील जमजम पेट्रोल पंपासमोर कार आणि टँकरचा भीषण अपघात झाला. यामध्ये कारमधील पाच जणांपैकी चार जणांचा जागीच मृत्यू झाला. जखमी एकाला उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांचा समावेश आहे.

बीड
सदाशिव भिंगे (वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष, लातूर) सुभाष भिंगे, व्यंकट सकटे, सदाशिव गडदे अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर राम भिंगे हे जखमी असून बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले आहे.

कार चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार दुभाजकावर आढळली

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, लातूर येथील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे यांच्यासह चौघे जण लातूरवरून औरंगाबादकडे कारने चालले होते. याच दरम्यान गेवराईजवळ कार चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार दुभाजकावर आढळली व त्याच वेळेला समोरून भरधाव टँकर येत होता. टँकरची जोरदार धडक कारला बसली यामध्ये कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, टँकरची धडक बसल्याने कारचा अक्षरशः चुराडा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महामार्ग पोलीस सहायक निरीक्षक प्रविण बांगर, गेवराई ठाण्याचे निरीक्षक पुरुषोत्तम चोबे दाखल झाले आहेत.

हेही वाचा - 'टॉप सिक्युरिटी'मधील अधिकाऱ्याला ईडीकडून अटक; प्रताप सरनाईकांचे आहेत निकटवर्तीय

Last Updated : Nov 26, 2020, 4:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.