बीड - जिल्ह्यातील गेवराई-माजलगाव मार्गावर कार आणि क्रुझरचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घडली. भागवत बप्पा भायगुडे ( वय 52, रा. रुई, ता. गेवराई) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा - 'इंदिरा गांधीनींही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार केला' मंत्री जितेंद्र आव्हाडांचे वादग्रस्त वक्तव्य
गेवराई तालुक्याच्या रुई माध्यमिक विद्यालयातील शिक्षक गुरुवारी शाळा सुटल्यानंतर कारने बीडकडे येत होते. या वेळी त्यांच्या कारने गडी माजलगाव मार्गावर टोल नाक्याजवळ माजलगावकडे जाणाऱ्या क्रुझरला धडक दिली. या अपघातात भागवत भायगुडे यांचा मृत्यू झाला. ते रूई येथून बीडला जाण्यासाठी कारमध्ये बसले होते. या अपघातात चालक गणेश पंडितराव देशमुख यांच्यासह शिक्षक काळे व उनवणे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्रुझरमधील प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.
हेही वाचा - 'शरद पवारांच्या सल्ल्याने यशस्वी राज्यकारभार करू'