ETV Bharat / state

दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेकापचा बैलगाडी मोर्चा

author img

By

Published : Feb 12, 2021, 4:59 PM IST

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकापने बैलगाडी मोर्चा काढला. यावेली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

bullock-cart-morcha-hits-the-district-collectors-office-to-support-the-farmers-agitation-in-delhi
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला शेकापचा बैलगाडी मोर्चा

बीड- गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली येथे चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी करत बीड येथे शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे बीड जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणानून गेला होता. शेतकऱ्यांनी थेट आपल्या बैलगाड्या जिल्हाधिकारी कार्यालयात घुसवल्या होत्या.

याप्रसंगी बीडचे जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे ते तीन कायदे केंद्र सरकारने तात्काळ रद्द करावेत, याशिवाय बीड जिल्ह्यामध्ये सक्तीची वीजबिल वसुली सुरू आहे. ती तात्काळ थांबवावी व अनेक वर्षांत बळीराजा आर्थिक संकटात आहे, याची दखल सरकारने घ्यावी. शेतकऱ्यांकडे असलेले वीज बिल सरकारने माफ करावे, बीटी कापसाचे बोगस बियाणे देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे 14 दिवसाच्या आत ऊस बील द्यावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनाच पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्या मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा-

मागील अनेक वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, या मागणीकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे बळीराजा दिवसेंदिवस अधिकच संकटात सापडत असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे मोहन गुंड यांनी यावेळी सांगितले.

पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ तात्काळ थांबवावी -

केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढ थांबवली नाही तर यापुढच्या काळात अधिकच महागाईचा भडका उडेल. सरकारने इंधनाच्या वाढवलेल्या दराबाबत पुनर्विचार करून वाढवलेले दर कमी करावेत, अन्यथा महाराष्ट्रातील गोरगरीब जनता केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही यावेळी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मोर्चात सहभागी झालेल्या दाधिकार्‍यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.