ETV Bharat / state

Beed Tembhe Ganpati : गणेश चतुर्थी नंतर पाच दिवसांनी होते 'या' गणपतीची स्थापना, वाचा काय आहे कारण? - पर्यावरण पुरक मूर्ती

Beed Tembhe Ganpati : संपूर्ण भारतात गणेशोत्सवाची सुरुवात गणेश चतुर्थीला होते. मात्र बीड जिल्ह्यातील एका गणपतीची स्थापना 5 दिवस उशिरानं होते. यामागे एक रंजक इतिहास आहे.

Beed Tembhe Ganpati
Beed Tembhe Ganpati
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 12:05 PM IST

गणेश चतुर्थीच्या पाच दिवस उशिराने होते गणपतीची स्थापना

बीड Beed Tembhe Ganpati : गणेशोत्सवाच्या दहा दिवस गणपतीचा उत्साह महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात असतो. प्रत्येक शहर, गावातील ठिकाणी गणपतीची मंदिरं गजबजलेली दिसून येतात. गणेशोत्सवात अनेक सार्वजनिक मंडळं मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात गणपतीची स्थापना करतात. मात्र असं असलं तरी जवळपास ज्या दिवशी देशभरात गणपती बाप्पाची स्थापना होते, त्या दिवसापासून 5 दिवसानंतर बीड जिल्ह्यातील एका गणपतीची स्थापना होते. नवसाला पावणारा गणपती म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात या गणपतीची ख्याती आहे.

काय आहे इतिहास : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील धोंडीराज टेंबे गणेश मंडळाची स्थापना निजामाच्या काळात 122 वर्षांपूर्वी झाली. या गणपतीची स्थापना आपल्या गणपतीच्या स्थापनेपासून जवळपास 5 दिवसानंतर होते त्यामुळेच या गणपतीचा इतिहासही रंजक आहे. निजाम कालीन राजवटीत 122 वर्षांपूर्वी या गणपतीच्या स्थापना मिरवणुकीस परवानगी नसल्यानं मिरवणूक अडविण्यात आली होती. त्यामुळं सदस्यांनी मिरवणूक अडविल्यानं त्याठिकाणाहून घोड्यावर हैदराबादला जात ताम्रपटावर स्थापनेची परवानगी आणली होती. यामुळं 5 दिवस गणपती त्याच ठिकाणी थांबविण्यात आला होता. यामुळंच मागील 122 वर्षांपासून या गणपतीची स्थापना 5 दिवस उशिराने म्हणजेच भाद्रपद एकादशीच्या दिवशी व विसर्जन चतुर्दशीनंतर येणाऱ्या पौर्णिमेला होते.

गणेश मंडळाचे नाव कसे पडले : निजाम काळात 1901 साली या गणपतीची स्थापना करण्यात आली होती. तेव्हा विजेची सोय नसल्यानं गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रकाश असावा म्हणून भाविक आगीचे टेंभे धरत असत, ही परंपरा आजही कायम असून यामुळंच या गणपतीला टेंभे गणेश मंडळ नाव पडले असावे, असं या मंडळाचे अध्यक्ष अनंतशास्त्री जोशी यांनी सांगितले.

पर्यावरणपूरक गणपतीची मूर्ती : या गणपतीची मूर्ती माती, शेण, चिखल, साळवणाच्या मिश्रणातून साकारली जाते. एवढी वर्षे लोटली, काळ बदलला तरी देखील पर्यावरण पूरक मूर्तीची परंपरा या मंडळांनी आजही टिकवून ठेवलीय. पीओपीच्या मूर्तींमुळे जलप्रदूषण होते याचीच जाणीव ठेवत मातीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते.

हेही वाचा :

  1. Ganesh Festival २०२३ : गणरायानं स्वप्नात येऊन सांगितलं मूर्तीचं गुपीत, वाचा खंडाळ्याच्या पावन गणपतीची आख्यायिका
  2. Ganeshotsav २०२३ : गणपतीनं स्वप्नात येऊन दिला दृष्टांत, काय आहे पाच गावांच्या सीमेवर वसलेल्या मयुरेश्वर मंदिराची आख्यायिका
  3. Ganesh Visarjan 2023 : मूकबधिर मुलांनी केली सांकेतिक भाषेत गणपतीची आरती, पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.