ETV Bharat / state

BRS News Beed : शिवराज बांगर यांचा राजीनामा; बीआरएस ही भाजपची बी टीम असल्याचा गंभीर आरोप - बीडचे नेते शिवराज बांगर

सहा महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात बीआरएसमध्ये प्रवेश केलेले बीडचे नेते शिवराज बांगर यांनी बीआरएस पक्षाला रामराम केला आहे. त्यांनी बीआरएस पक्ष भाजपाची बी-टीम असल्याचा गंभीर आरोप केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसमधील अस्वस्थ गटांचा गळा घोटण्यासाठी बीआरएसने काही एजंट नेमले आहेत. कार्यकर्त्यांना राजकीय आमिष दाखवून बीआरएसमध्ये प्रवेश घडवून आणत असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

BRS News Beed
BRS News Beed
author img

By

Published : Aug 17, 2023, 4:41 PM IST

बीड : सहा महिन्यांपूर्वी मोठ्या थाटामाटात बीआरएसमध्ये दाखल झालेले बीआरएस राज्य समन्वयक शिवराज बांगर यांनी बीआरएसवर गंभीर आरोप केले आहेत. राजीनामा देण्यापूर्वी बांगर यांनी "बीआरएस ही भाजपाची बी टीम असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसमधील अस्वस्थ गटांची गळचेपी करण्यासाठी बीआरएसने आठ दलाल नेमले असल्याचा हल्लाबोल त्यांनी बीआरएसवर केला आहे. बांगर यांच्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

बीआरएसमध्ये भ्रमनिरास : "बीआरएसमधील काही दिवसांच्या अनुभवानंतर माझा भ्रमनिरास झाला आहे. ही वेळ महाराष्ट्रातील जनतेवर येऊ नये, त्यामुळे आम्ही योग्यवेळी सर्वांना सावध करीत आहोत," असे बांगर यांनी म्हटले आहे. शिवराज बांगर बाहेर पडल्यावर धाराशिवमधील काही पदाधिकारीही बीआरएस सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. शिवराज बांगर यांनी सहा महिन्यांपूर्वी बीआरएसमध्ये प्रवेश केला होता. त्यापूर्वी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऊसतोड कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष होते. आता बांगर यांनी बीआरएसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांचे समर्थकही राजीनामा देणार असल्याची माहिती मिळत आहे.

बांगरांचा राजकीय प्रवास : शिवराज बांगर हे आगोदर शिवसेनेत होते. त्यानंतर त्यानी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला होता. वंचितमध्ये एकोपा नसल्याचे कारण देत त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडचीठ्ठी दिली होती. त्यांनतर त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (MNS) प्रवेश केला होता. मनसेनंतर बांगर परत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर होते. तसे त्यांचे उद्धव ठाकरे गटातील वरिष्ठ नेत्यांशीही बोलणे झाले होते. जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनीही बांगर यांना पक्षात घेण्यासाची तयारी दर्शवली होती. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे बांगर यांचा प्रवेश उबाठा गटात रोखण्यात आला होता. त्यानंतर बांगर यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला होता.

हेही वाचा -

  1. Sarpanch Joined BRS : भाजप मतदारसंघातील 52 सरपंचांनी केला बीआरएस पक्षात प्रवेश
  2. KCR on Sharad Pawar : 'आम्हाला भाजपची 'बी' टीम म्हणता, आता तुमचाच पक्ष...', केसीआर यांचा शरद पवारांवर हल्लाबोल
  3. KCR on Kolhapur Sangli Visit: केसीआर उद्या कोल्हापूर, सांगली दौऱ्यावर; शेतकरी संघटनेचा 'हा' नेता बीआरएसच्या वाटेवर

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.