बीड: बीड जिल्ह्यात सन 2022-23 मध्ये कृषी विभागाच्या आकडेवारी नुसार MREGS अंतर्गत जवळपास 93.45 हेक्टर पर्यंत आंबा लागवड झालेली आहे. मागिल वर्षी 148.37 हेक्टर क्षेत्रावर केशर आंब्याची लागवड झालेली आहे. जिल्ह्यात अनेक फळांच्या बागांची लागवड झालेली पाहायला मिळते. यामध्ये काश्मीरमध्ये पिकणारे सफरचंद देखील बीडच्या मातीत पिकवले जाते. जिल्ह्यात चिकु, डाळींब, मोसंबी, अंजीर, जांभूळ, पेरु, स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फळ जिल्ह्यात पिकविले जाते, तर कोकणात पिकवला जाणारा व गुजरातच्या मातीत पिकवला जाणारा आंबा सुद्धा बीडच्या मातीत पिकवला जातो.
एका झाडापासून दोन क्विंटल आंबा: बीड जिल्ह्यामध्ये केशर आंब्याच्या बागा वाढलेल्या दिसत आहेत. फळबाग लागवड करत असताना काही अस्मानी संकटे येतात, त्याच्यावर मात करून फळबाग लागवड केल्याचे शेतकरी सांगतात. जिल्ह्यातील नितीन काकडे यांनी पारंपारिक पद्धतीने शेती केली आहे. ते सांगतात की, प्रत्येक वर्षी कापूस लागवड करायची आणि पुन्हा कापूस उपटायचा, नांगरणी, पेरणी, खुरपणी यामध्ये आपले मेहनत वाया जाते. आंब्याच्या एका झाडापासून दोन क्विंटल आंबा उत्पादन मिळते.
केशर आंबाला मिळाले नामांकन: जिल्ह्यातील केशर आंब्याला जिओग्राफिकल इंडीकेटर मिळाले आहे. ज्या वेळेस माल विदेशामध्ये पाठवायचा असतो त्यावेळेस, बीड जिल्ह्याचा केशर आंबा म्हणून नामांकन मिळालेले आहे, ही संपूर्ण मराठवाड्यासाठी ही एक आनंदाची बाब आहे. मराठवाडा प्रसिद्ध म्हणून हा केशर आंबा जगामध्ये ओळखला जातो. गुजरात नंतर बीड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील आंबा यांची चव वेगळीच आहे. एकदा खाल्ल्यानंतर जिभेवर रेंगाळते. केशर ही जात अत्यंत चविष्ट आंबा म्हणून ओळखला जातो.
आंब्याला लागते खोडकिड: अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व गारामुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे अनेक फळांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर यामधूनही वाचून पुढे निघालेले फळ आता सुसाट सुटलेल्या वाऱ्याने खाली पडत आहेत. या आंब्याला खोडकिड मोठ्या प्रमाणात लागते. खोड किडीने बागाच्या बागा उध्वस्त होतात. शेतकऱ्याकडे एकच पीक नसते, त्यामुळे त्याच्याकडे शेतकरी लक्ष देत नाही. ज्यावेळेस आपण फळबाग लागवड करतो त्यावेळेस त्याला पोटच्या लेकरप्रमाणे शेतकरी जपत असतो.
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आव्हान: जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मिश्र फळबागेची लागवड करावी. त्यामध्ये आंबा, चिकू, मोसंबी, डाळिंब करावी. ही फळबाग लागवड करत असताना मिश्र फळबाग लागवड करावी, ज्या फळांचे उत्पादन होत आहे ते विकता आले पाहिजे. त्या फळांच्या बागा लावा, इतर पिकांचे क्षेत्र कमी करा, त्यामुळे जमिनीचा पोत खराब होत चालला आहे. एक पीक पद्धती न घेता नका साखळी पद्धतीने पीक पद्धती घ्या. यावर्षी जर तुम्ही सोयाबीन लागवड केली असेल तर, त्यावरती दुसऱ्या पिकाची लागवड करा, एकच पीक घेत असल्यामुळे जमिनीचा पोत खराब होत आहे. जर तुम्हाला एक पीक लावायचे असेल तर, तुम्ही एक झाड लावा, कारण ते फळपीक एक पिढ्या दोन पिढ्या तीन पिढ्या चालणारे पीक आहे. तेवढ्याच पटीने उत्पादनातही वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशोक वैद्य ग्राहक सांगतात की, ते या ठिकाणी गेल्या चार वर्षापासून आंबा खाण्यासाठी घेऊन जातात. अनेक दिवसापासून या आंब्याची चव लागल्यामुळे ते या बागेतील फळे घरी घेऊन जातता. हा नैसर्गिक पिकवलेला आंबा असतो. त्यामुळे याची चव वेगळीच लागते.
हेही वाचा: Hapus Mangoes हापूस आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक असा ओळखा ओरिजनल हापूस