ETV Bharat / state

'संचारबंदी शिथिलतेच्या निर्णयाबाबत पुनर्विचार व्हावा, पोलीस यंत्रणेवरदेखील येतोय ताण'

संचारबंदीच्या वेळेमध्ये दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने बदल करून सम व विषम तारखेनुसार जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, सकाळी 11 ते 3 या दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर गर्दी करत असल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले.

बीड
बीड
author img

By

Published : Apr 7, 2020, 7:05 PM IST

बीड - कोरोना विषाणूशी लढा देण्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या संचारबंदीच्या वेळेमध्ये दोन दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने बदल करून सम व विषम तारखेनुसार जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, सकाळी 11 ते 3 या दरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक रस्त्यावर गर्दी करत असल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले.

बीड जिल्हा प्रशासनाने संचारबंदी स्थितीसंदर्भाने सम-विषमतेच्या तारखेप्रमाणे संचारबंदी ठेवण्यास हरकत नाही. मात्र, सकाळी 11 ते 3 ऐवजी सकाळी 7 ते 9 हा वेळ ठेवला तर बाजारात जास्त गर्दी होणार नाही व पोलिसांवर देखील अधिक ताण येणार नाही.

बीड जिल्हा प्रशासनाने मागील पंधरा दिवसांपासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम केलेले आहे. याचा परिणाम जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकही कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. संचारबंदी बाबतीत बीड जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी वेळेमध्ये बदल करून सकाळी सात ते नऊ ऐवजी दुपारी 11 ते 3 वेळत जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांना वेळ दिला. यातच सम-विषम तारखेचा निर्णय देखील घेण्यात आला. मंगळवारी 7 एप्रिलला बीड शहरात नागरिकांनी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. शेकडो दुचाकी वाहने पोलिसांनी पोलीस ठाण्यात लावली आहेत.

संचारबंदीचा वेळ व सम-विषम तारखेचा नियम लागू केल्यामुळे बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. नागरिकांच्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. हे वास्तव मंगळवारी बीड शहरात विविध ठिकाणी पाहायला मिळाले, निश्चितच संचारबंदीच्या शिथीलतेची वेळ यामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येत आहे. या निर्णयाबाबत जिल्हा प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी देखील काही सामाजिक कार्यकर्त्यांमधून मागणी होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.