ETV Bharat / state

बीड: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारपर्यंत 49.13 टक्के मतदान - Beed District Latest News

बीड जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत 49.13 टक्के मतदान झाले असून, मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बीड: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दुपारपर्यंत 49.13 टक्के मतदान

author img

By

Published : Jan 15, 2021, 4:36 PM IST

बीड- बीड जिल्ह्यातील 111 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत 49.13 टक्के मतदान झाले असून, मतदान प्रक्रिया शांततेत सुरू असल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

जिल्ह्यात 362 मतदान केंद्रावर ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. एकूण 111 ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. 111 ग्रामपंचायतींसाठी 848 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. शुक्रवारी सकाळी सात पासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली होती. सकाळच्या टप्प्यात मतदानाची आकडेवारी धिम्या गतीने वाढत होती. मात्र साडेअकरानंतर मतदानासाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याचे पाहायला मिळाले. दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत 49.13 टक्के मतदान झाले असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मतदानासाठी महिला देखील मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रावर येत असल्याचे चित्र बीड तालुक्यातील काही गावांमध्ये पाहायला मिळत आहे. मतदान काळात काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता असल्याचे निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.