ETV Bharat / state

धान्य तर दिलं, पण दळण कसं आणायचं? गावी परतल्यानंतरही ऊसतोड मजुरांची फरफट

मजूरांजवळ धान्य असताना गावातल्या पिठाच्या गिरणीवर धान्य दळून आणायला जाता येत नाही. त्यामुळे मजूरांची फरफट होत असल्याचा आरोप मजूरांनी केला आहे.

author img

By

Published : May 3, 2020, 3:28 PM IST

lockdown
ऊसतोड मजुरांची फरफट

बीड - पश्चिम महाराष्ट्रातून हजारो ऊसतोड मजूर बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मात्र, जोपर्यंत क्वारंनटाईनचा अवधी संपत नाही तोपर्यंत त्यांना गावात जाण्यासाठी परवानगी नाही. तसेच खबरदारी म्हणून पर जिल्ह्यातून व राज्यातून आलेल्या ऊसतोड मजुरांना गावाबाहेर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांची हेळसांड होते आहे. तर मजूरांजवळ धान्य असताना गावातल्या पिठाच्या गिरणीवर धान्य दळून आणायला जाता येत नाही. त्यामुळे मजूरांची फरफट होत असल्याचा आरोप मजूरांनी केला आहे.

ऊसतोड मजुरांची फरफट

बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. दरवर्षी लाखो ऊसतोड मजूर ऊस तोडण्यासाठी परराज्यात व जिल्ह्यात जातात. यावर्षी अचानक उद्भवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. परिणामी बाहेरगावी असलेले ऊसतोड मजूर अडकून पडले होते. मात्र, शासनाने त्या ऊसतोड मजुरांना गावी आणण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर मजूर गावी परतले मात्र तरीही मजुरांची फरपट होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

गावाच्या बाहेर झोपड्या तयार करुन मजुरांना त्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. जोपर्यंत त्यांचा क्वारंनटाईन केलेला अवधी संपत नाही, तोपर्यंत त्यांना गावात येण्यासाठी बंदी आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे ऊसतोड मजुरांना गावातील पिठाच्या गिरणीवर दळण आणण्यासाठी देखील जाता येत नाही. त्यामुळे आम्ही खायचे काय? असा सवाल मजुरांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, काही सामाजिक संस्था या मजुरांना मदत करत असल्याचे दिसत आहे. रविवारी आष्टी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते विजय गोल्हार यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने त्या ऊसतोड मजुरांना किराणा साहित्याचे वाटप केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.