ETV Bharat / state

परळीतील औष्णिक विद्युत केंद्रातील सर्व संच बंद; १ हजारवर कामगार बेरोजगार - Unemployment due to thermal power plant parli

परळी वैजनाथ येथे औष्णिक विद्युत महानिर्मितीच्या तीन संचांतून ७५० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. या महानिर्मिती केंद्रामुळे शहर व परिसरातील अनेक नागरिकांना छोटा मोठा रोजगार मिळतो. मात्र, लाँकडाऊन व विजेची मागणी कमी झाल्याने ६ मे पासून औष्णिक विद्युत महानिर्मिती केंद्राचे सर्व संच बंद असल्याने मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे.

Unemployment thermal power plant parli
औष्णिक विद्युत केंद्र परळी
author img

By

Published : May 26, 2021, 10:42 PM IST

परळी वैजनाथ (बीड) - परळी वैजनाथ येथे औष्णिक विद्युत महानिर्मितीच्या तीन संचांतून ७५० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. या महानिर्मिती केंद्रामुळे शहर व परिसरातील अनेक नागरिकांना छोटा मोठा रोजगार मिळतो. मात्र, लाँकडाऊन व विजेची मागणी कमी झाल्याने ६ मे पासून औष्णिक विद्युत महानिर्मिती केंद्राचे सर्व संच बंद असल्याने मोठी बेरोजगारी निर्माण झाली आहे.

हेही वाचा - मोहा येथे संस्थात्मक विलगीकरण केंद्राची सुरुवात‌

शहरात महाऔष्णिक विद्युत केंद्र आहे. सुरुवातीला या महानिर्मिती केंद्रातून १ हजार १०० मेगावॅट वीजनिर्मिती केली जात होती. यातील दोन विद्युत निर्मिती संचांची मुदत संपल्याने ते भंगारात काढण्यात आले आहेत. उर्वरित तीन संच हे २५० मेगावॅटचे असल्याने या तीन संचांतून ७५० मेगावॅट विद्युत निर्मिती केली जाते. या संचांना सुरुवातीपासूनच ग्रहण लागले आहे. येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रास कधी पाणी कमी पडते, कधी कोळसा नसतो, दोन्ही उपलब्ध असेल तर या संचातून निर्माण होणारी वीज महाग पडते, म्हणून विद्युत निर्मिती बंद केली जाते.

सध्या लाँकडाऊनमुळे विजेची मागणी कमी झाल्याने ६ मे पासून येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील तीनही संच सध्या बंद आहेत. महाराष्ट्रातील इतर ठिकाणचे सर्व संच सुरू आहेत. येथील संचच का बंद आहे? असा प्रश्न बेरोजगार युवक करत आहेत. आधीच कोरोनामुळे संपूर्ण आर्थिक व्यवस्था विस्कळीत झाली आहे, रोजगाराची साधने बंद झाली आहेत, येथे सर्वात जास्त रोजगार उपलब्ध करून देणारा हा एकमेव प्रोजेक्ट आहे. तोही बंद पडल्याने बेरोजगारी निर्माण झाली आहे. काही करून हे संच कसे सुरू होतील याकडे संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

विद्युत निर्मिती संच सातत्याने बंद करावे लागत असल्याने यावर अवलंबून असलेले सुशिक्षित बेरोजगार, कॉन्ट्रॅक्टर यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या तिन्ही संचांच्या ठिकाणी काम करणारे जवळपास १ हजारच्यावर कामगार आज बेरोजगार झाले आहेत. ६ मे पासून बंद केलेले संच अद्यापही बंदच आहेत. आज (दि. 26) मे रोजी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, विजेची मागणी कमी झाल्यामुळे संच बंद आहेत.

हेही वाचा - धक्कादायक.. कंपनीने नोकरीवरून काढल्याने युवकाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.