ETV Bharat / state

Beed Bribe : कांदा चाळीच्या अनुदानासाठी 2 हजाराची लाच स्वीकारताना कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात - Krishna Mahadev Aglave

कांदा चाळीच्या अनुदानासाठी २ हजारांची लाच घेताना कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात अडकल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. याच तालुका कृषी कार्यालयात तो गेल्या १८ वर्षांपासून कार्यरत आहे. कृष्णा महादेव आगलावे असे कृषी अधिकाऱ्याचे नाव असून त्यांनी शेतकऱ्याकडे पाच हजारांची लाच मागितली होती.

Beed Bribe
Beed Bribe
author img

By

Published : May 31, 2023, 10:10 PM IST

लाच स्विकारतांना कृषी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

बीड : शासनाकडून विविध योजना शेतकऱ्यांना दिल्या जातात मात्र, या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याचे आपण अनेकवेळा पाहिले आहे. मात्र ज्यावेळेस एखादी योजना शेतकरी करत असतो त्यावेळेस जे सरकारी अधिकारी आहेत जे कर्मचारी आहेत. ते मात्र त्या अनुदानातील काही पैसे लाटण्याचे काम करत असतात. असाच एक प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यातील कृषी विभागात घडला आहे. कांदा चाळीचे अनुदान मंजुरीसाठी कृषी सहाय्यकाने 2 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्याची घटना पाटोद्यात घडली आहे. हा सापळा बीड एसीबीच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडला आहे.

काय आहे प्रकार : दिलीप असराजी सानप हे पाटोदा तालुक्यातील सौताडा या गावातील रविवाशी आहेत. त्यांच्या शेतात कांदाचाळ मंजूर झाली असून त्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. कृषी अधिकारी कार्यालयातून अनुदान मंजूर करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. यात कृषी सहाय्यक कृष्णा महादेव आगलावे यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 2 हजार रुपयाची लाच देण्याचे ठरवले. दरम्यान याबाबत दिलीप सानप यांनी एसीबीकडे तक्रार दिली. या अनुषंगाने पथकाने दि. 31 मे बुधवार रोजी दुपारच्या सुमारास कृषी अधिकारी कार्यालयात सापळा रचून 2 हजार रुपयाची लाच स्वीकारताना कृषी सहाय्यक कृष्णा आगलावे याला रंगेहात पकडले आहे.

याप्रकरणी गुन्हा दाखल : कृष्णा आगलावे गेली 18 वर्षापासून एकाच तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. सौताडा येथे कृषी सहाय्यक कर्तव्य बजावत गेली अनेक वर्षापासून पाटोदा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या या कृष्णा आगलावेंनी अनेक शेतकऱ्यांची पिळवणूक केल्याची माहिती मिळत आहे. विशेष करून शासनाने दिलेल्या शेतकऱ्यांच्या योजनेवर डल्ला मारण्याचे काम अधिकारी करीत असल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे. हे काम करत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडे पुरावा नसल्याकारणाने आगलावेंना मोकळे रान मिळाले होते. मात्र, या प्रकरणात तो शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्याने कृष्णा आगलावे पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहे.

हेही वाचा -

Sameer Wankhede Bribe Case : आर्यन खान खंडणी प्रकरण ; ज्ञानेश्वर सिंगांना 9 लाख दिल्याचा सॅम डिसुजाचा याचिकेत आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.