ETV Bharat / state

Illegal Alcohol Sale : अवैध दारू विक्रीवर गुन्हे शाखेची कारवाई; बेकायदेशीर दारू विकणाऱ्यावर पोलिसांची कडक कारवाई

बीड जिल्ह्यातील विविध भागात अवैद्य दारू ( Untreated alcohol in various parts of Beed district ) प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे बेकायदेशीर दारू ( illegal liquor ) चालकांना चांगलाच घाम फुटला आहे.

Illegal Alcohol Sale
Illegal Alcohol Sale
author img

By

Published : Jan 4, 2023, 9:45 PM IST

बीड - अवैद्य दारू ( Untreated alcohol in various parts of Beed district ) प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला अवैद्य दारू संदर्भात माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे बीडच्या स्थानिक गुन्हा शाखेने अवैध दारू धाड टाकत कारवाई केली. अवैध दारू तयार करून बिसलेरी बॉटलमध्ये ठेवण्यात येत होती.

अवैध दारू विक्रि सुरु - जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रि सुरु आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अशा मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी नवीन वर्षात मोहीम हाती घेतली आहे. स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांना गुप्त माहिती मिळाली की, तेलगांव येथील मिटन लगड यांचे पत्र्याचे शेडमध्ये इसम नामे प्रकाश मोनाया भंडारे रा. दिंद्रुड हा विनापरवाना बेकायदेशीररित्या शिंदी दारु तयार करीत आहे.

विविध ठीकाणी पोलिसांचा छापा - पोलिसांनी छापा टाकला असता इसम नामे प्रकाश मोनाया भंडारे वय 22 वर्षे रा. दिंद्रुड हा एका पत्र्याचे शेडमध्ये एका निळया रंगाच्या बॅरलमध्ये 100 लिटर शिंदी दारू बनवत असल्याचे निदर्शनास आले. दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्यासह 7 हजार 200 /- रु.चा माल यावेळी जप्त करण्यात आला. आरोपीविरुध्द पोलीस ठाणे, दिंड्रूड येथे कलम 328, महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे सुधारीत 2018 चे कलम 65(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

तसेच दिनांक 03 रोजी बीड ते इमामपूर बार्शी नाका, बीड येथील दत्ता पवार यांचे पत्र्याचे शेडमध्ये मनोज लक्ष्मण तेलंग, आकाश लक्ष्मण तेलंग दोन्ही रा. आढळून आले. त्यांच्याविरुध्द पोलीस ठाणे, पेठ बीड येथे गुन्हा दाखल केला आहे.

ता. वडवणी पिंपरखेड येथील करीम सालार शेख वय 38 वर्षे रा. पिंपरखेड ता. वडवणी जि.बीड हा विनापरवाना बेकायदेशीररित्या देशी, विदेशी दारुची विक्रि करतांना आढळून आला आहे. त्याविरुद्ध वडवणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.