बीड - जिल्ह्यातील माजलगाव जवळ भेंड खुर्द येथे एका उसाच्या ट्रॅक्टरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातांमध्ये कारमधील पती-पत्नी जागीच ठार झाले. व्यकंट विश्वनाथ बल्लोरे (वय 60), सुलोचना व्यंकट बल्लोरे (वय 50) ( रा. बनवस जि. परभणी) असे अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीचे नावे आहेत. तर कारमधील अन्य तिघेजण जखमी आहेत. जखमींवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पती-पत्नी जागीच ठार-
माजलगाव पाथर्डी राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर छत्रपती साखर कारखान्यावर एक ट्रक ऊस घेऊन येत होता. दरम्यान, गढीकडून येणाऱ्या कारने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. कारमधील दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील नागरिक आणि काही ऊसतोड कामगारांनी ट्रॅक्टरमध्ये घुसलेली कार बाहेर काढली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जखमींवर उपचार सुरू-
भीषण अपघातात अहिल्याबाई बापुराव बल्लोरे, प्रताप अंकुश नळगिरे आणि एक पाच वर्षीय बालक जखमी झाले. जखमीना पुढील उपचारार्थ बीड येथे हलविण्यात आले. तर अपघातात ठार झालेले पती-पत्नी यांचे मृतदेह जातेगाव येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यास दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा- अल्पवयीन 'फेसबुक' मैत्रिणीवर अत्याचाराचा प्रयत्न, तरुणासह मदत करणारा अटकेत