ETV Bharat / state

कोरोनाचा कहर... बीड जिल्ह्यात आढळले नवे 6 रुग्ण - beed corona update

शनिवारी जिल्ह्यातील 248 संशयीत रुग्णांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 6 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

बीड कोरोना अपडेट
बीड कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 6, 2020, 7:11 AM IST

बीड - जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी जिल्ह्यातील 248 संशयीत रुग्णांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार 6 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 239 निगेटिव्ह, 3 जणांचा अहवाल अनिर्णित असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

रविवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये एका 38 वर्षीय महिलेचा व 11 वर्षीय मुलाचा समावेश हे दोघेही जुना बाजार परिसरातील रहिवासी आहेत. संत कबीर नगरमधील 1 रहिवासी, अंबाजोगाई येथील 40 वर्षीय महिला, आष्टी तालुक्यातील गंगादेवीमधील 65 वर्षीय पुरुष, परळी येथील 58 वर्षीय पुरुष, असे एकूण 6 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरात गेल्या 4 दिवसांपासून लॉकडाऊन आहे. परळी शहरासह तब्बल 14 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे. जिल्ह्यातून आत्तापर्यंत 3 हजार 728 व्यक्तींचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. तर बीड जिल्हा रुग्णालयात 36 जणांवर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.